"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
[[चित्र:WLA lacma 12th century Maharishi Agastya.jpg|thumb|right|200px|अगस्त्य महर्षींचे शिल्प]]
 
'''अगस्त्य महर्षी''' (नामभेद: '''अगस्त्य''', '''मैत्रावरुणी''', '''अगस्ति''';) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. [[सप्तर्षी|सप्तर्षींपैकी]] मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे [[वसिष्ठ]] ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ‘अगस्त्य’ हे भगवान [[शिव|परमशिवांचे]]देखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिऴमुनीतमिळमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. [[ऋग्वेद|ऋग्वेदामध्ये]] (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत [[काशी|काशीक्षेत्रातील]] त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
== दक्षिण दिशेस प्रस्थान ==
ओळ १७:
 
== ग्रंथनिर्मिती==
[[तमिळ|तमिऴतमिळ]] साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस [[वैद्यशास्त्र]] तथा [[ज्योतिषशास्त्र|ज्योतिषशास्त्राचे]] आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. [[आयुर्वेद|आयुर्वेदीय औषधांवर]] अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. [[विश्वकर्मा|विश्वकर्म्याने]] त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा महर्षींनी [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रावर]] लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधिविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत [[विष्णु|विष्णुपूजन]] करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्रे समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रंथ महर्षींनी रचला. [[वराहपुराण|वराहपुराणातील]] ‘अगस्त्यगीत’, पञ्चरात्रम्‌पत्र्चरात्रम्‌ तथा [[स्कन्दपुराण|स्कन्दपुराणातील]] ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींच्या कर्तृत्वाचा उल्लेख असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.
 
==जीवनकार्य==
महाभारतातील शांतिपर्वात त्यांनी गायलेली विद्या ‘[[अगस्त्यगीता]]’ नामे ओळखली जाते. [[केरळ|केरळ प्रांताच्या]] ‘कलरीपायट्टु’ (मार्शलआर्ट)ची ‘वर्मक्कलै’ म्हणून ओळखली जाणारी [[नि:शस्त्र युद्धकला|निःशस्त्र युद्धकलेची]] एक दाक्षिणात्य शैली आहे. ह्या ‘वर्मक्कलै’चे संस्थापक आचार्य तथा आदिगुरु भगवान श्री अगस्त्य महर्षीच असल्याचे मानले जाते. ह्या विषयावर त्यांनी तमिऴभाषेततमिळभाषेत ग्रंथलेखनही केले. महर्षी [[तंत्रशास्त्र|तंत्रशास्त्राचार्य]] तर होतेच त्यातही त्याकाळी साधारणपणे अप्राप्य मानल्या जाणाऱ्या आकाशभ्रमणाचेही ज्ञान त्यांना होते. [[युद्धशास्त्र|युद्धशास्त्रात]] तथा तत्कालीन आधुनिक [[धनुर्विद्या|धनुर्विद्येत]] देखील ते पारंगत होते. ते नेहमी धनुष्यबाण सोबत बाळगत. दुर्गम भागात उपलब्ध होणाऱ्या [[धातू|धातूंच्या]] रासायनिक मिश्रणाचे प्रयोग करून सिद्ध केलेली अस्त्रे ही सुयोग्य योद्ध्याच्या हाती सोपवण्याचे कार्य महर्षींनी जीवितकार्य मानून अंगीकारल्याचे दिसून येते. त्यांच्या उदाहरणावरून, त्यांच्यासारखा एक महर्षी युद्धकाळांत उपयोगी पडणारी शस्त्रास्त्रे बनवणारादेखील असू शकतो असे लक्षांत आल्यावाचून राहत नाही. विंध्यपर्वत पार करून दक्षिणेमध्ये येतांना तसेच [[दंडकारण्य|दंडकारण्यामध्ये]] निवास करतांना निसर्गदत्त धातूंच्या खाणींवर कोणाचा अधिकार असावा हा विषय ते लक्षांत घेतात. भूसर्वेक्षण, जलसर्वेक्षण तथा दक्षिणेतील [[कावेरी]], [[ताम्रपर्णी]] ह्या नद्यांच्या पाण्याचे तत्काळीन समाजासाठी त्यांनी केलेले उपयोगी व्यवस्थापन आदि घटना त्यांच्या अथांग कर्तृत्वाची साक्षच देतात. एकूणच त्यांचे सारे जीवन हे विविध विद्या ग्रहण करून त्यांचा आध्यात्मिक अंगाने अभ्यास करत, तत्काळी उपलब्ध भौतिक साधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहिलेले असल्याचे दिसते.
 
== तमिऴतमिळ भाषेचे जनक ==
भगवान श्री अगस्त्य महर्षी ह्यांनीच [[तमिळ|तमिऴभाषेचीतमिळभाषेची]] अक्षरमाला निर्मिली. ह्याकारणे ते तमिऴतमिळ भाषेचे जनक मानले जातात. त्यासह ते तमिऴतमिळ भाषेचे आद्य वैयाकरणीही होत असा विश्वास आहे. प्रसिद्ध तमिऴतमिळ व्याकरणपर ग्रंथ ‘तॊल्‍क्काप्पियम्’‘तोल्‍क्काप्पियम्’ ज्यांनी रचले, ते ‘तॊल्‍क्काप्यर‘तोल्‍क्काप्यर मुनी’ हे महर्षींचेच प्रथमशिष्य होत. संस्कृतभाषेच्या तोडीस तोड ज्ञानभाषा म्हणून तमिऴभाषेलातमिळभाषेला मान्यता प्राप्त होण्यात महर्षींनी स्वतः पुढाकार घेऊन तमिऴभाषेततमिळभाषेत निर्मिलेली विपुल ग्रंथसंपदा ही मुख्यत: कारणीभूत ठरावी. दक्षिणेकडे निसर्गतःच भरपूर प्रमाणांत उपलब्ध असलेल्या ताडाच्या झाडांच्या पत्रांची उपयुक्तता जाणून, त्यांवर कोरून लेखन करण्याच्या कलेचा शोध त्यांनी ज्ञानविद्या दीर्घकाळ टिकण्याच्याच उद्देशाने लावला. दूरदृष्टीने ताडपत्रांच्या केलेल्या ह्या उपयोजनाचा प्रभाव शतकानुशतके टिकून राहिला असून पुरातन काळांतील अशी अनेक हस्तलिखिते आजही दक्षिण भारतांत आढळतात.
 
== नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती ==
ओळ ३०:
== विविध स्थळे ==
[[चित्र:Agasti.jpg|250px|इवलेसे|उजवे|[[अकोले]] येथील अगस्ती ऋषींची मूर्ती]]
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिऴनाडूतमिळनाडू (चेन्‍नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह [[इंडोनेशिया]], [[जावा]], [[सुमात्रा]] इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा कॅनोपस (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.
 
==अगस्तीच्या जीवनकार्याचा वेध घेणारी मराठी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले