"जागतिक मूत्रपिंड दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही बघा → हे सुद्धा पहा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''जागतिक [[मूत्रपिंड]] दिवस''' हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.<br />
 
मूत्रपिंडे (किडनी) ही शरीरातील अत्यंत महत्वाचेमहत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.<br />
 
==महत्त्व==
==महत्व==
मूत्रपिंडे शरीरातील पाण्याचा व क्षारांचा समतोल राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील हजारो विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासह [[रक्तदाब]] नियंत्रण, व्हिटॅमिन डीची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करत असतात. व्हिटॅमिन डीमुळे हाडांना मजबुती मिळते. मूत्रपिंडे निकामी होण्यास [[मधुमेह]] व उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. सत्तर टक्के किडनीचे विकार हे मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे होतात. त्याशिवाय संसर्ग, काही अनुवंशिक आजार व सातत्याने वेदनाशामक गोळ्यांचे सेवन यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. पर्यायी औषधे म्हणून अनेक जण भस्म वगैरेचे सेवन करतात. मात्र त्यातून [[पारा]] वगैरे विषारी धातू शरीरात शिरतात.<br />