"वज्रपाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

एक बोधिसत्व
Content deleted Content added
नवीन पान
(काही फरक नाही)

१३:००, २४ जानेवारी २०२० ची आवृत्ती

वज्रपाणी एक बोधिसत्त्व. ध्यानी बुद्ध अक्षोभ्य आणि मामकी देवी यांचा आध्यात्मिक पुत्र. वज्र हे याचे प्रतीक असून, नीलकमल हे अभिज्ञानचिन्ह आहे.

हा नीलवर्ण आहे. याच्या प्रतिमा उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असून, त्याच्या हाती वज्रसहित कमल असते. केव्हा केव्हा तो एका हातात छातीजवळ वज्र धरतो.

सुजाता ही याची शक्ती असून, ॐ वज्रपाणि हुम् हा याचा मंत्र आहे. जेव्हा बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी नाग आले, तेव्हा बुद्धाने वज्रपाणीला गरुडापासून त्यांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली, अशी कथा आहे. याने असुरांशी युद्ध करण्यासाठी अनेक उग्र रूपे धारण केली होती.

वज्रपाणिलोकेश्वर या नावाने याचे आणखी एक वेगळे रूप आढळते, ते असे- हा एकमुख व द्विभुज असून, कमळावर उभा असतो. तो आपल्या उजव्या हातात वज्र घेऊन ते मस्तकावर धरतो व डावा हात बेंबीजवळ धरतो. तो अर्धपर्यंक नृत्यावस्थेत आहे.

या बोधिसत्त्वाच्या बऱ्याच मूर्ती तिबेट व चीन या देशांत आढळल्या आहेत. [१] [२]

कलादालन

संदर्भ

संदर्भसूची

जोशी, पं. महादेवशास्त्री. p. ४६१. वज्रपाणी Missing or empty |title= (सहाय्य)