"पौगंडावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
माणसाची [[मानवी वाढ व विकास|वाढ व विकास]] हे जन्मापासून (त्याही आधी [[गर्भधारणा|गर्भधारणेपासून]]) सुरू असले तरी त्यांच्या [[भ्रूण]], [[बाळ|बाळ/नवजात अर्भक]], [[शिशुवय|शिशु]], [[बालपण|बालक]], [[कुमारवय|कुमार]], [[किशोरवय|किशोर]], [[तारुण्य|तरुण]], [[प्रौढत्व|प्रौढ]], [[वृद्धावस्था|वृद्ध]], इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला '''किशोरवय''' म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलाचे ([[कुमारवय|कुमाराचे]]) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ [[तारुण्य|तरुणात]] रूपांतर होते. याच वयात होणार्‍या माणसाच्या '''लैंगिक वाढ व विकासाच्या''' टप्प्याला '''पौगंडावस्था''' म्हणतात.
 
'''पौगंडावस्था''' ('''Puberty'''<ref>http://en.wikipedia.org/wiki/Puberty</ref>) हा [https://marathidoctor.com/gupt-rog-laingik-samasya-sexually-transmitted-diseases-in-marathi-html.html/amp लैंगिक संक्रमणाचा] कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.
 
[[मेंदू|मेंदूकडून]] [[प्रजनन ग्रंथी|प्रजनन ग्रंथींकडे]] विशिष्ट वयात येणार्‍या [[संप्रेरक|संप्रेरकांच्या]] स्वरूपातील संदेशांमुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. या संदेशांमुळे मुलामधे [[वृषण|वृषणाची]] आणि मुलीमधे [[बीजांडकोष|बीजांडकोषाची]] वाढ होते. मुलामधे वृषणातून [[टेस्टोस्टेरॉन]] व मुलीमधे बीजांडकोषातून [[ईस्ट्रोजेन]] व [[प्रोजेस्टेरॉन]] या अंतःस्रावांची निर्मिती सुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे मुलात [[शुक्रजंतू]] व वीर्य निर्मिती आणि मुलीत [[स्त्रीबीज]] निर्मिती व [[मासिक पाळी]] सुरू होणे ही लैंगिक कार्ये सुरू होतात. मुलामधे [[शिश्न|शिश्नाची]] व मुलीमधे [[गर्भाशय]] व [[योनी|योनीमार्गाची]] वाढ होते. त्याचबरोबर फार शारीरिक फरक नसलेल्या मुलात मुलगा व मुलगी असे स्पष्ट बाह्य भेद दाखवणारी, [[जननेंद्रीये|बाह्य जननेंद्रियांवर]] केस उगवणे, मुलाचा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे, इत्यादी आणि मुलीमधे [[स्तन|स्तनांची]] वाढ होणे, शरीराला गोलवा येणे, इत्यादी चिन्हेही दिसू लागतात. त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात.