अनामिक सदस्य
→इतर महत्त्वाचे: improve information
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
(→इतर महत्त्वाचे: improve information) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
==इतर महत्त्वाचे==
संपूर्ण मराठी साहित्य जगतात प्रख्यात झालेले कविवर्य ना. घ. देशपांडे मेहकरचे. त्यांच्या शीळ, अभिसार, खूणगाठी या काव्यसंग्रहांतील कवितांनी रसिकांना वेड लावले होते. राज्य पुरस्कारांपासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मेहकरच्या उत्तरेला टेकडीवर असलेल्या पुरातन कंचनीच्या महालासंबंधीच्या आख्यायिकेवर ‘कंचनीचा महाल’ हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिले. त्याचा स्वतंत्र संग्रह निघाला. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र मेहकरात मोठी पोकळी निर्माण झाली होती. १९९५पासून मात्र किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांनी ही पोकळी भरून काढत संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या साहित्यमुळे मेहकरची साहित्य चमक दाखवली. १९७६मधे जन्मलेल्या ह्या साहित्यिक शिक्षकास राज्य पुरस्कारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या तुटलेल्या बोटांचे संदर्भ, मृगजळाचे पाणी आणि विषात वितळलेले सत्य ह्या संग्रहाना विशेष मागणी असून हे संग्रह खुप गाजले. ना.घं.चे बंधू वि.घ. देशपांडे हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ते खासदारही होते. १९३९ मध्ये त्यांचा सत्कार मेहकरच्या बालाजी मंदिरात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकरांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी सावरकरांनी युवकांना मोठय़ा संख्येने सैन्यात भरती होण्याचे आवाहन भाषणातून केल्याची नोंद आहे.<br/>
ना.घं.नी मेहकरात मेहकर एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय व कन्या विद्यालय आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय व कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली.डॉ.
बँकिंग क्षेत्रात शहर मागे नाही. जीवन गतिमान झाले व लोकांच्या अपेक्षा गरजा वाढल्या. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांबरोबरच सहकारी बँकांनीही व्यवहार वाढवले. श्याम उमाळकरांची सत्यजित पतसंस्था, डॉ. सुभाष लोहिया, उदय सोनी, आदींच्या प्रयत्नातून विस्तारलेली महेश पतसंस्था, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पतसंस्था, वसंतराव मगर, सर्पमित्र वनिता बोराडे, नलिनी खडसे यांच्या विविध पतसंस्था या अर्थविषयक संस्थांच्या जाळ्याने बचत व कर्जपुरवठा गरजा भागल्या व त्याबरोबरच शहराच्या व्यापार, रोजगारसंबंधीच्या भरभराटीला मोठा हातभार लागला. रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या उसाला किंमत देण्याचे काम प्रतापराव जाधव, भगवान मानधने, बबनराव भोसले, प्रकाश मापारी, विलास काळे आदींच्या प्रयत्नातून साकारलेल्या शारंगधर साखर कारखान्यानेही केले आहे. मेहकर परिसरातला हा एकमेव मोठा उद्योग. एरव्ही अनेक वर्षांपासून मेहकरला अनेक एकरांच्या पडीत जमिनीवर फक्त एम.आय.डी.सी.चा बोर्डच तेवढा उभा आहे. औद्योगिक वसाहत उभीच झाली नाही. गावात मोठमोठी व्यापार प्रतिष्ठाने, व्यापारी संकुलात वाढ झाली पण, मोठ्या रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.
|