"राष्ट्रपती भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: संदर्भ जोडला.
→‎top: संदर्भ जोडला
ओळ ३:
 
== इतिहास ==
फोर्ट विल्यमचे गव्हर्नर जनरल एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बेल्वेदेर हाऊस, कोलकाता येथे रहात असत. त्यानंतर गव्हर्मेंट हाऊस, कोलकाता (आत्ताचे राजभवन, कोलकाता) बांधण्यात आले. लॉर्ड वेलस्लीच्या आज्ञेप्रमाणे १७९९ ते १८०३ या काळात एक भव्य राजमहाल बांधण्यात आला. आणि १८५४ मध्ये बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरने तिथे राहण्यास सुरुवात केली. डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबाराच्यावेळी नवी दिल्लीमध्ये ब्रिटीश व्हॉईसरॉयसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आता भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagranjosh.com/general-knowledge/the-history-of-rashtrapati-bhavan-the-official-home-of-the-president-of-india-1343022754-1|शीर्षक=The history of Rashtrapati Bhavan : The official home of the President of India|दिनांक=2012-07-23|संकेतस्थळ=Jagranjosh.com|अॅक्सेसदिनांक=2019-11-28}}</ref>
 
जुन्या दिल्लीच्या दक्षिणेला नवी दिल्ली हे शहर वसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा, भारताच्या व्हॉईसरॉयच्या नवीन राजवाड्यासाठी विस्तीर्ण जागा आणि महत्त्वाचे स्थान राखून ठेवण्यात आले.  या व्हॉईसरॉय हाऊससाठी आणि त्याच्या जवळच्या सचिवालय इमारतींसाठी सुमारे ४,००० एकर जागेचे संपादन करण्यात आले. यासाठी इथे असलेली रायसीना आणि माल्चा ही गावे आणि तेथील ३०० कुटुंबे भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत विस्थापित करण्यात  आली.[https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/8681785/New-Delhi-villagers-seek-compensation-100-years-after-being-evicted-by-Raj.html]