"व्हॅटिकन सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४८:
इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली. तिथूनच जगभरातल्या सर्व कॅथॉलिक चर्चेसचे संचालन केले जाते. इसवी सन ३० ते ६४ या काळात ‘पोप’ म्हणून सेंट पीटरने कार्यभार चालवला. पीटर हा ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक आणि पहिला धर्मप्रसारक होता. सन ३२६ मध्ये, सम्राट कॉन्स्टन्टाइनने सेंट पीटरच्या समाधीवर अतिभव्य वास्तू (बाझिलिका) उभारली. एका लांब-रुंद दिवाणखान्यात दुतर्फा उंच खांबांची रांग आणि त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट अशी त्याची रचना आहे. १६व्या शतकात तिथेच पुनर्बांधणी होऊन, ख्रिस्ती धर्मीयांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू बांधण्यात आली.
‘व्हॅटिकन’ने लोकांना उपयुक्त अशा स्वत:च्या यंत्रणा उभारलेल्या आहेत. टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेडिओ, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषधविक्री यांच्याबरोबर पोपच्या सुरक्षेसाठी खास दल उभारलेले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी तिथे आयात कराव्या लागतात. आयात-निर्यातीवर किंवा उत्पन्नावर कुठलाही कर नाही. जगभरातील १३० कोटी रोमन कॅथॉलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यांमधून राज्याचा सर्व खर्च चालतो. ठेवींवरील व्याज, तिकिटे आणि नाण्यांची विक्री, संग्रहालय प्रवेश शुल्क, ग्रंथ प्रकाशन यांमधूनही प्रचंड उत्पन्न होत असते. सन १९८०पासून तिथले सर्व आर्थिक व्यवहार लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जातात. सचिवालयाद्वारे पाच कार्डिनल (चर्चमधील अधिकारी) देशाचे सर्व व्यवस्थापन बघतात. बहुसंख्य रहिवासी हे स्त्री-पुरुष धर्मोपदेशकच आहेत. बाकीचे कार्यालयीन सेवक, व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणारे लोक तिथे राहतात. व्हॅटिकन राज्य ग्रंथालयात सुमारे दीड लाख दुर्मीळ हस्तलिखितांचा खजिना आहे. ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनाच्या आरंभीच्या काळातील सुमारे १६ लाख छापील पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. व्हॅटिकन स्वत:चे दैनिक (रोज) प्रसिद्ध करते. अत्याधुनिक छापखान्यांमधून भारतीय भाषांसहित ३० भाषांमधून पुस्तके आणि माहितीपत्रके छापली जातात. ‘बायबल’ हा जगातील सर्वाधिक खपाचा ग्रंथ आहे. रेडिओवरून ४० भाषांमधले कार्यक्रम सुरू असतात. स्वत:चे दूरदर्शन केंद्रही चालू आहे. १९८४ मध्ये ‘युनेस्को’ने ‘व्हॅटिकन सिटी’ला जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. धार्मिकदृष्ट्या पोप हा रोमचा बिशप असतो.
सन ६४मध्ये रोमच्या भीषण आगीत असंख्य ख्रिस्ती बांधव मृत्युमुखी पडले. सम्राट नीरोला ख्रिश्चन लोकांबद्दल विलक्षण राग होता. जिथे आग लागली त्याच ‘सर्कस’ भागात सेंट पीटरला क्रूसावर चढवण्यात आले, असे प्राचीन परंपरा सांगते. ‘व्हॅटिकन’च्या परिसरात इसवी सनापूर्वी फारशी वस्ती नव्हती; पण तो भाग पवित्र मानला जात असे. हळूहळू त्याचा विकास होत गेला. सुरुवातीला सुमारे एक हजार वर्षे पोपचे वास्तव्य रोमलगतच्या लॅटरन पॅलेसमध्ये असे. चौदाव्या शतकात तर पोप सुमारे ७० वर्षे पोप फ्रान्समधल्या ‘अॅविग्नन’‘ॲविग्नन’ गावी राहत असत. १८७०नंतर ‘व्हॅटिकन’ हेच त्यांचे केंद्र झाले. त्या शहराच्या आतील कुठल्याही व्यवहारात (धार्मिक वा अन्य) इटलीने कधीही हस्तक्षेप केला नाही. १९२९मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला मान्यता मिळाली, त्या वेळी इटलीचा भावी हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने राजाच्या वतीने आणि ‘पोप पायस ११’तर्फे कार्डिनल सेक्रेटरी पिएत्रो गॅस्पारी याने ‘स्वातंत्र्या’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या देशाने ‘तटस्थ’ भूमिका घेतली. जर्मनीसह सर्व फौजांनी ‘व्हॅटिकन’चा आदर करून, तिथले काहीही उद्ध्वस्त केले नाही. युद्ध संपल्यानंतर सन १९४६मध्ये ‘पोप पायस १२’ने नव्या ३२ कार्डिनल्सची नियुक्ती केली.
 
इटलीतून आलेल्या प्रवाशांना पासपोर्टचे निर्बंध नाहीत. सेंट पीटर चौक आणि बाझिलिका, तसेच धार्मिक समारंभांमध्ये लोकांना मुक्त प्रवेश असतो. फक्त त्याआधी विनामूल्य असलेली तिकिटे घ्यावी लागतात. बागांमध्ये नियोजित भेटीद्वारे गटागटाने जाता येते. तिथले हवामान रोमप्रमाणेच असते. ऑक्टोबर ते मेच्या मध्यापर्यंत, हिवाळ्यात अधूनमधून पाऊस पडतो. मे ते सप्टेंबर हवामान गरम, पण कोरडे असते. दव आणि धुक्याचेही अस्तित्व असते. महिन्यातील सूर्यप्रकाशाचे सरासरी तास ११० (डिसें.) ते ३३० (जुलै) असतात.