"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १८:
}}
 
'''छत्रपती शिवाजी महाराज जयंती''' किंवा '''शिवजयंती''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]]ातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त [[महाराष्ट्र सरकार]]ने निश्चित केल्याप्रमाणे [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते.<ref>[https://www.maharashtra.gov.in/1204/Public-Holidays महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या]</ref> महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
 
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.
 
== इतिहास ==
[[इ.स. १८६९]] साली [[महात्मा]]
[[जोतीराव फुले]] यांनी [[रायगड]]ावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुले व [[लोकमान्य]] [[बाळ गंगाधर टिळक]] यांनी [[इ.स. १८७०]] साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम [[पुणे]] येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. पुढे २०व्या शतकात, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
 
== उद्देश ==
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे उदात्त विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[आंबेडकर जयंती]]
* [[सम्राट अशोक जयंती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव_जयंती" पासून हुडकले