"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| चित्रशीर्षक = १८६४ मध्ये लिव्हिंगस्टोन
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = ग्लासगो
| जन्म_दिनांक = {{Birth date|df=yes|1813|3|19}}
| जन्म_स्थान = [[Blantyre, South Lanarkshire|Blantyre]],[[स्कॉटलंड]]
ओळ ५३:
}}
 
'''डेव्हिड लिव्हिंस्टन''' ([[जन्म]] -: ग्लासगो, १९ [[मार्च]] [[इ.स. १८१३]]; [[मृत्यू]] -: कांगी नदीचा किनारा, आफ्रिका,[[मे]] [[इ.स. १८७३]]) हे एक धाडशी [[स्कॉटिश]] [[धर्म]]ोपदेशक होते. त्यांनी [[झांबेजी नदी]]चा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी [[कांगो]], [[टांगानिका]], [[न्यासा]] इत्यादी [[सरोवर]]ांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला.
 
धर्मोपदेशक डेव्हिड लिव्हिंगस्टन पेशाने डाॅक्टर होता. जेव्हा तो २७ वर्षांचे झाले तेव्हा त्याने आफ्रिकेला जाऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे काम करीत करीत गरजू लोकांवर औषधोपचार करायचे ठरवले. जसेजसे दिवस जाऊ लागले तसे त्याला आफ्रिकेच्या अज्ञात प्रदेशांत फिरून, तेथील लोकांच्या काही अडचणी असल्याच तर त्या दूर करावयाची इच्छा झाली. जेथे हल्ली अंगोला झांबिया, झायरे, झिंबाब्वे, तांझानिया, बुरुंडी, मोझांबिक, रवांडा आदी देश दाखवतात ती लाखो चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा त्याकाळच्या आफ्रिकेच्या नकाशात कोरी दाखवत, कारण त्या देशांसंबंधी त्याकाळी सुविद्य जगाला काहीच माहिती नव्हती. आफ्रिका खंडाचा समुद्रकिनारा व नील नदीची माहिती उर्वरित जगाला होती, आणि तेवढेच भाग नकाशात दाखवले जात. डेव्हिड लिव्हिंगस्टनने उरलेली अज्ञात आफ्रिका बघायचे ठरवले.
 
लिव्हिंगस्टनच्या मनात आफ्रिकन लोकांबद्दल अपार सहानुभूती असल्याने तो त्यांच्यामध्ये सहज मिसळून गेला. त्याचे औषधोपचार आणि गोड वागणूक त्याला, मनात कोणतेही भय न बाळगता आफ्रिकेच्या दाट जंगलांत वसलेल्या जंगली माणसांच्या टोळ्यांपर्यंत पोचायला मदतरूप झाली. तेथे अशीच माणसे होती की ज्यांनी कधी गोरा माणूस पाहिला नव्हता. रोगराई तर अफाट होती. लिव्हिंगस्टनला स्वतःलाच ३१वेळा मलेरिया झाला' पण त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून त्याने स्वतःचे आणि अनेक आफ्रिकन लोकांचे प्राण वाचवले.
 
लिव्हिंगस्टनने केप ऑफ गुड होप (केप काॅलनी) पासून ते विषुववृत्तापर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत फिरून त्या भूभागाचा नकाशा बनवला. हल्ली व्हिक्टोरिया फाॅल्स म्हणून ओळखला जातो त्या (झांबेजी नदीचा) विशाल धबधबा लिव्हिंस्टनने शोधला. आणि ही सारी माहिती [[लंडन]]च्या राॅयल जाॅग्रफिकल सोसायटीला पाठवली.
 
सोळा सालच्या भटकंतीनंतर जेव्हा डेव्हिड लिव्हिंगस्टन [[लंडन]]ला परतला तेव्हा संपूर्ण राष्ट्राने त्याचा सत्कार केला.
 
(अपूर्ण)
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:इ.स. १८१३ मधील जन्म]]
[[वर्ग:स्कॉटिश व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १८७३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भूगोल]]