"गणेश गोविंद बोडस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २:
 
== कारकीर्द ==
गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली [[किर्लोस्कर नाटक मंडळी]]च्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली ''गंधर्व नाटक मंडळी'' स्थापण्यात [[गोविंदराव टेंबे|गोविंदराव टेंब्यांसह]] त्यांनी [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांना]] साह्य केले. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले.
 
''माझी भूमिका'' हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे..
 
== गणपतराव बोडस यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका ==
* एकच प्याला (सुधाकर)
* गुप्‍तमंजूष (मेघनाद, शृंगी)
* चंद्रहास (थोरला, दुष्टबुद्धी, भटजी, मदन, मांग)
* प्रेमशोधन (कंदन)
* मतिविकार (विहार)
* मानापमान (लक्ष्मीधर)
* मूकनायक (प्रतोद, विक्रांत)
ओळ ३०:
* बोडसांच्या रंगभूमीवरील योगदानाची दखल घेत [[संगीत नाटक अकादमी]]ने इ.स. १९५६ साली त्यांना [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवले.
* इ.स. १९४० साली नाशिक येथे झालेल्या ३१व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
* १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
 
{{DEFAULTSORT:बोडस,गणेश गोविंद}}
ओळ ३८:
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी संगीत नाटककार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]