"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कथानक: टंकनदोष काढले , अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎कथानक: अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
== कथानक ==
{{विस्तार}}
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या अकराव्या वर्षात पदार्पण करण्यापासुन होते. हॅरी लहानपणापासुन त्याची मावशी पेटुनिया च्या घरी राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणुक मिळत असते. बाराव्या वर्षी त्याला [[रुबियस हॅग्रीड]] नावाच्या दैत्याकडुन कळते की तो एक जादुगार आहे व ह्या विश्वाला समांतर असे एक जादुचे विश्व आहे. हॅरीची रवानगी हॉग्वार्ट्झ नावाच्या जादुचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत होते. तिथे त्याला रॉन व हर्माइनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना ([[जेम्स पॉटर]] व [[लिली पॉटर]]) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, (जो कथानकाचा खलनायक आहे) तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
 
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाला वश करून अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती व शरीर परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणुन पाडतो.
 
दुसऱ्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची छोटी बहीण [[जिनी विजली]]ला पछाडते व तिच्याकरवे [[गुप्त चेंबर]] उघडविते. त्या चेंबरमध्ये असलेला [[बासिलिकबॅसिलिक सर्प]] हॉग्वार्ट्झमधील [[मगल]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने [[ग्रिफिंडोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिक सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझकाबान]] नावाच्या तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्या निमित्ताने हॉग्वार्ट्झला [[पिशाच्च|पिशाच्च्यांची]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझकाबानचे रक्षक असतात. पिशाच्चांच्या अवतीभवती येण्याऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी ते शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉग्वार्ट्झमध्ये [[काळ्या जादुविरुद्ध बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की त्याला पिशाच्चांच्या शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनस मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, जे आजवर भल्याभल्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते. शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पॅटिग्र्यु]]ने हॅरीच्या वडीलांबद्दल विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वॉल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सगळे खापर सिरियसवर फोडलेले असते व जगाच्या लेखी त्याला वीरमरण आलेले असते. हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला पिशाच्चांच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[हिंस्र लांडगा|हिंस्र लांडग्यामध्ये]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
ओळ ५०:
 
ह्या घराण्यांतील काही घराण्यांच्या मते ज्यांच्या कुटुंबात मगल जोडीदार किंवा मगल कुटुंबात जन्मलेला जादूगार जोडीदार म्हणून निवडला जातो अशी कुटुंबे ही अनेक पिढ्या जादूगारच असलेल्या कुटुंबांपेक्षा कमी व हलक्या दर्जाची , अशुद्ध रक्ताची आहेत व अशी भेसळ घडवून आणणे हे एकप्रकारचे घृणास्पद कार्य आहे .
 
एक पालक मगल व दुसरा जादूगार किंवा दोन्ही पालक जादूगार पण आजी आजोबा पैकी कोणीतरी मगल असून जी मुले जादुई गुण घेऊन जन्माला आली त्या सगळ्यांसाठी हाफ ब्लड हि संज्ञा . प्युअर ब्लड जादूगारांच्या मते हाफ ब्लड कमी दर्जाचे पण अगदीच तिरस्करणीय नाही .
 
तर ज्यांच्या मागच्या पिढ्यांत कोणी जादूगार नव्हते , ज्यांचा जादूशी काही संबंध नाही अशा मगल कुटुंबात जन्मलेले जादूगार म्हणजे अशुद्ध रक्ताचे - मडब्लड्स किंवा मगलबॉर्न .. हे प्युअर ब्लड्स च्या मते अगदीच खालच्या दर्जाचे , तिरस्करणीय . अशांना जादूगार समाजात प्रवेशच देऊ नये , जादू तंत्रविद्यालयात प्रवेश देऊ नये , जादूचे शिक्षण घेऊ देऊ नये . आणि मगल लोक तर पूर्णच तिरस्करणीय , त्यांच्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही .
 
अर्थात सगळीच प्युअर ब्लड घराणी या मताची नव्हती . काही असा भेद मुळीच मानत नसत आणि सर्व समान हे तत्व मानीत . शिवाय जादूगारांच्या घराण्यांची संख्या मुळातच थोडी होती त्यामुळे सुरूवातीच्या काळात तरी वंश टिकवायचा तर भेसळीचा धोका पत्करून मगल लोकांमधून जोडीदार निवडण्याशिवाय पर्यायच नव्हता . त्यामुळे काही प्युअर ब्लड घराण्यांमध्ये असे मगलबॉर्न किंवा मगल लोक जोडीदार म्हणून स्वीकारले गेले आणि हे वंश पुढे वाढले ... आज त्यात जन्माला आलेले काहीजण हाफब्लड तर काहीजण प्युअरब्लड आहेत .
 
== हॅरी पॉटर पुस्तके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले