"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ दुरुस्ती
ओळ ३:
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
{{बदल}}
ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत {{संदर्भ हवा}}. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले {{संदर्भ हवा}}. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता {{संदर्भ हवा}}. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|/qXeZ72qKNigwQ== | शीर्षक = श्री गोविंद प्रभू {{मृत दुवा}}| लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
==स्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन==
ओळ १०:
केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही.
 
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|/qXeZ72qKNigwQ== | शीर्षक = श्री गोविंद प्रभू {{मृत दुवा}}| लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
== संदर्भयादी ==