"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या ६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत. मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते. या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २ फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर पाण्यात बुडून जाते.
 
मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, [[विठ्ठल]] मंदिर, [[गणपती]] मंदिर, [[दत्त]] मंदिर, [[चंदनशेष]] मंदिर, [[हनुमान]] मंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर,संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात मशिदींची संख्याही मोठी आहे. अलबेरुनीच्या ग्रंथात,[[आईन-ए अकबरी]] या अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की, मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.
 
धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून १९६२ ते १९७८ असे सलग १६ वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते. १९७२ च्या भीषण दुष्काळात साखर कारखाना उभारणीच्या काळात काम नसलेल्या शेकडो हातांना काम देण्याचे मौलिक कार्य अण्णासाहेबांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शुकदास महाराजांच्या पुढाकाराने साकारलेला स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम येथे आहे. विवेकानंद आश्रम हे मानव सेवेचे केंद्र आहे. आज तेथे शाळा, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विविध वसतिगृहे, कर्णबधिर -अपंग निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ (इंग्रजी माध्यम) व आरोग्य विषयक सेवा, धमार्थ रुग्णचिकित्सा केंद्र, रोगनिदान शिबिरांचे आयोजन, कृषी प्रदर्शनांचे आयोजन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, विवेकानंद वाटिका, हरिहर तीर्थक्षेत्र, इत्यादींमुळे शहराला नंदनवनाचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र शासनाने विवेकानंद आश्रमास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी पौष वद्य पंचमी ते सप्तमी दरम्यान भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तिन्ही ही दिवस नामवंत कलाकार, संगीतकार, गायक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार आपली सेवा देतात. पौष वद्य सप्तमीला तीन लाख भाविक महाप्रसाद सेवन करतात.

संपादने