"ललित कलादर्श" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Adding category for maintenance
छो Bot: उल्लेखनीयता साचा जोडला
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता
}}
संगीतसूर्य [[केशवराव भोसले]] यांनी १ जानेवारी १९०८ रोजी ’ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ची स्थापना केली. नंतर ही संस्था [[बापूराव पेंढारकर]] आणि पुढे [[भालचंद्र पेंढारकर]]यांनी चालू ठेवली. ’ललितकलादर्श’ने [[मामा वरेरकर|भा.वि. वरेरकरांची]] अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. रंगभूमीवरील नेपथ्याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रयोग ’ललितकलादर्श’ला वरेरकरांच्या नाटकाच्या लेखनामुळे करावे लागले. उदाहरणार्थ ’सत्तेचे गुलाम’ या नाटकापासून मराठी रंगभूमीवर नेपथ्य म्हणून फ्लॅट सीन यायला लागले. या आधी गुंडाळी पडद्यावर नाटके होत असत. या पडद्यामुळे रस्ता, महाल, देऊळ राजवाडा, घर यांची हुबेहूबता आणण्याचा कितीही प्रयत्‍न केला तरी तो रंगवलेला पडदा आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नव्हती. ’ललितकलादर्श या संस्थेने प्रथम फ्लॅट सीनचा उपयोग सुरू केला.