"शतपत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २८:
ग्रंथ लिहिणे हे लोकहितवादी विद्वत्तापूर्ण काम समजतात. कारण त्यांच्या समोर युरोपीयन देशात काय घडत आहे ते होते. बेकन, गॅलिलिओ, देकार्त, कोपरनिकस, केप्लर यांना अर्वाचीन युरोपचे जनक असे म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेलच. ह्या सगळयांनी पुस्तके लिहिली. खूप निरीक्षण करून, संघोधन करून त्यांनी भोवतीची भौतिक सृष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून हाती लागलेले सिद्धांत पुस्तकांच्या रूपाने जगासमोर ठेवले. ‘छापण्याची कला’ या पत्रात लोकहितवादी म्हणतात, ‘वृत्तपत्रे म्हणजे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. (वर्तमानपत्रे म्हणजे मोठी जीभ असे समजले पाहिजे . कारण एक जण आपल्या छोटया जीभेने जेवढे बोलेल आणि जितक्यांना ते ऐकू जाईल त्याच्यापेक्षा वर्तमानपत्रामुळे जास्त लोकांपर्यत आवाज पोहोचेल. म्हणून वर्तमानपत्र म्हणजे मोठी जीभ आहे, असे त्यांना वाटते.) याचा उपयोग इंग्रज लोक जसा करितात तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवतील तर फार चांगले होईल. आणि हा समय आला आहे की, आता आपले मनातील गोष्ट उघडपणीं व निर्भयपणाने सांगतां व कळवतां येते. असे पूर्वी नव्हते.’ लोकहितवादींचे हे विचार आज आपण ज्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणतो तेच आहेत. मुद्रणकला आणि वर्तमानपत्र यामुळे एक प्रकारचे निर्भीड लेखन सुरू झाले त्याचे महत्त्व लोकहितवादींना समजले होते.
मुद्रण, वर्तमानपत्र तसेच उत्तम ग्रंथ यामाध्यमातून समाजसुधारणा घडवून आणता येईल हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यासाठीच ते इंग्रज विद्वानांचा आणि त्यांच्या ग्रंथांचा गौरव करतात. ‘त्यांची योग्यता अशी आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्या दिवशीं तो ग्रंथ लिहूं शकतील. कोणत्याही विषयावर बोलू शकतील. जे जे या पृथ्वीत आणि आकाशांत आहे ते सर्व त्यांस ठाकठीक दिसतें आणि चंद्र फिरतो याचें त्यास आश्चर्य वाटत नाही. दगड वरती उडविला म्हणजे खाली पडतो याचें देखील कारण त्यास माहीत आहे. तात्पर्य त्यास कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.’ लोकहितवादींची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि तारतम्याने समजून घेण्याची वृत्ती या पत्रातून तुमच्या लक्षात आली का ? त्याकाळात भारतीयांना सृष्टीत जे घडते ते चमत्कार वाटत असत. ईश्वराची करणी वाटत असे. पण पाश्चात्य जगात विज्ञानाची प्रगती झाली होती. आणि अशा वैज्ञानिक विषयांवर पुस्तके लिहून ते ज्ञान त्यांनी सगळयांपर्यंत पोहोचवले होते याचे लोकहितवादींना विशेष कौतुक वाटते असले तर त्यात नवल ते काय ?
 
19. सुधारणा करणार कोण ?
भारतीय समाज सुधारायची गरज होती हे नक्की. धर्म, नीती, राज्यशासन या सर्वात सुधारणा करायला हवी होती. पण मुख्य प्रश्न होता की ह्या सुधारणा करणार कोण ? त्यासाठी कोण पुढाकार घेणार ? आणि देशभर त्याची अंमलबजावणी कोण करणार ? विद्येचे महत्त्व तर समजले पण समाजात त्यासाठी बदल कोण करणार ? जातींमध्ये, स्त्री-पुरुषांमधे समानता असली पाहिजे, ती कशी येणार ? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर समाजसुधारकांना दिसत होते ते म्हणजे ते म्हणजे इंग्रज शासन. इंग्रज केवळ धर्मावर भिस्त न ठेवता बुद्धिवर विश्वास ठेवतात. ते अधिक कर्तबगार आणि प्रामाणिक आहेत असे समाजसुधारकांना वाटत होते. इंग्रज हे खरेतर युरोपातून म्हणजेच बाहेरून आलेले. त्यांचे राज्य म्हणजे परक्यांचे राज्या होते. पण तरीसुद्धा आपल्या समाजाची सध्याची दुरवस्था, निर्नायकी अवस्था या सगळयात आपल्या समाजाला योग्य त्या मार्गाला लावण्याची क्षमता फक्त इंग्रज लोकांच्यात आहे असे मत लोकहितवादींनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळया पत्रांमधून मांडले आहे.
ह्या प्रकारची समाजसुधारकांची मते आज आपल्याला विचित्र आणि चुकीची वाटतात. परक्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे पारतंत्र्यात राहण्यासारखे आहे असे आपल्याला सहजच वाटते पण लोकहितवादींनी आधीच्या राज्याशी तुलना करत, इंग्रजांचे राज्य कसे जास्त चांगले आहे त्याची मांडणी केली आहे. त्या काळात पुष्कळ शास्त्री-पंडित आणि मराठा सरदार यांच्या काळात समाजात दुर्व्यवहार, असंतोष, अन्याय होत होता. जुलूम होत होता. देशात सुधारणा नव्हती. नवीन विद्या, संशोधन याला वाव नव्हता. अनेक लोक स्वतःच्या राज्यातच लूट करत होते. आधीच्या राजांनी, सरदारांनी परमुलखांत लूटपाट केली, जाळपोळ केली त्यापेक्षा इंग्रज बरे असे त्यांना वाटते. राज्य करणारेच लुटारूंची टोळी बाळगून आपल्याच रयतेला लुटर होते. त्या लुटारूंचा इंग्रजांनी बंदोबस्त केला. सती सारख्या अन्यायकारक चाली इंग्रजांनी बंद केल्या. यामुळे लोकहितवादींना इंग्रजांचे राज्य अधिक बरे आहे असे वाटत होते. आपल्या 12 व्या पत्रात ते त्याविषयी लिहितात, ‘तेव्हा इंग्रजांचा अंमल हा हंगाम बरा आहे. पेशव्यांचे राज्यांत कोणी कांही सुख भोगिलें. परंतु विचार केला नाही, खाल्ले मात्र, शेवटीं दुसऱ्याने तोंडांत मारून नेले, तेव्हा डोळे उघडले. तस्मात् इंग्रजांचे अमलाचा परिणाम चांगला, पण लोक शहाणे होण्यास खुशी नाहीत. ...... बाजीरावांचे मूर्तिमंत राज्य डोळयांपुढे उभे राहतें. मामलेदार मक्ते चठ करून रयत लुटतात. जमा येते ती रांडा, गोंधळी, भट, आर्जवी, ढोंगी वगैरे खाऊन जातात. हेंच बाजीरावाने केलें व अद्याप मराठी राज्यात हेंच आहे. उजाडले किंवा मावळले, यांची त्यांस खबर नसते. फक्त जनावराप्रमाणे खाणे, निजणे एवढयापुरती काळजी.’
अशी अवस्था त्यांना दिसत होती म्हणून ते लोकांना विनवणी करतात, ‘हिंदु लोकांनी याचा विचार पाहावा. या साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदु लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या. व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांचीं मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हें ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलांस हुशार होण्यास दहावीस वर्षे लागतात, मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशें चारशें वर्षे लागतील.’ अर्थात लोकहितवादींचे हे सगळेच तर्क योग्य होते असे नाही. इंग्रज सर्व बाबतीत आपल्यासाठी अनुकूल किंवा फायद्याचे होते असे खरे तर नव्हतेच. पण त्यावेळी परिस्थिती पाहता आपल्या समाजामधे कोणाकडे योग्य नेतृत्व नव्हते आणि इंग्रजांची आधुनिक विचारसरणी आणि विज्ञान वृत्ती ही आपल्या समाजात नव्हती. त्यामुळे समाजात बदल घडवायचा असेल तर पूर्ण वेगळया विचारांची माणसे हवीत असे लोकहितवादींना वाटले यात नवल नाही.
[[सदस्य:सुनीला विद्या|सुनीला विद्या]] ([[सदस्य चर्चा:सुनीला विद्या|चर्चा]]) १५:१३, १३ ऑगस्ट २०१८ (IST)
"https://mr.wikipedia.org/wiki/शतपत्रे" पासून हुडकले