"रमा बिपिन मेधावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन
छो बदल केला
ओळ २८:
}}
'''पंडिता रमाबाई सरस्वती''' (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.
=== बालपण ===
 
 
 
 
== चरित्र ==
=== बालपण ===
पंडिता रमाबाई यांचा जन्म [[अनंतशास्त्री डोंगरे]] व [[लक्ष्मीबाई डोंगरे]] यांच्या पोटी, [[गंगामूळ]] ([[कर्नाटक]]) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते{{संदर्भ हवा}}, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली.{{संदर्भ हवा}} रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
 
Line ४० ⟶ ३५:
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना [[मराठी]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[गुजराती]], [[बंगाली]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[संस्कृत]], [[हिब्रू]] या सर्व भाषा अवगत होत्या.{{संदर्भ हवा}}
 
=== विवाह आणि समाजकार्य ===
 
इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील [[बिपिन बिहारीदास मेधावी]] या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते.{{संदर्भ हवा}} पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. [[बालविवाह]], [[पुनर्विवाह|पुनर्विवाहास]] बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम [[पुणे | पुण्यात]] व नंतर [[अहमदनगर]],[[सोलापूर]], [[ठाणे]], [[मुंबई]], [[पंढरपूर]], [[बार्शी]] या ठिकाणी [[आर्य महिला समाज|‘आर्य महिला समाजाची]] स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या [[इंग्लंड|इंग्लंडला]] गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात ([[चेल्टनहॅम लेडीज कॉलेज]]) त्यांनी [[संस्कृत]] शिकवले.{{संदर्भ हवा}} १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.{{संदर्भ हवा}}