३,१२८
संपादने
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
||
==भेंडी लागवड==
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.
==हंगाम==
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.
|
संपादने