"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची [[पाने]], [[फळे]], [[बिया]], [[साल]], [[मुळे]] सर्व कडू असतात. याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-[[पक्षी]], पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, [[जिरे]], [[मिरे]],सैन्धव [[मीठ]], [[ओवा]], [[गूळ]], [[हिंग]], [[चिंच]] हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबचे झाड मोठे असते. हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते.याची पाने हिरवी,मध्यम आकाराची अ लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते. या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात.या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. त्या फळाचा आकार लहान असतो. त्यात बी असते.त्याला निंबोळी असे म्हणतात.
==गुणधर्म==
*अंगात मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा महत्वाच गुणधर्म कडूनिंबात आहे. उन्ह्याल्यामुळे [[गोवर]], [[कांजिण्या]], [[देवी]]( पूर्वी) ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडूनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
*पूर्वी स्त्रियांना प्रसूती नंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडूनिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे बाळंतरोग होण्याची भीती नसे आणि मातेला [[दूध]] हि जास्त येत असे. व्यालेल्या गायीला हि कडूनिंबाचा पाला खाण्यास देत असत.
*कडूलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, [[लघु]], मंदाग्निकर-[[खोकला]], [[ज्वर]], अरुची, कृमी, [[कफ]], कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू कल्पवृक्षच आहे.
==धार्मिक महत्व==
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला[[गुडीपाडवा]] ला होते. त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड,[[मीठ]],[[गुळ]] घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे.हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरु होते .चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून त्यामुळे नाना प्रकारचे आजार होतात. अश्या आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडूनिंबाचे पूजन सांगितले आहे. धार्मिक दृष्टीने [[गुढीपाडवा]] हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि वर्षारंभचा दिवस.या दिवशी आंघोळीच्या पाण्यात डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची [[पूजा]] करतात. कडूनिंबाची पाने आणि [[मीठ]], [[मिरे]], [[हिंग]], [[ओवा]], [[चिंच]], आणि [[गूळ]] घालून केलेली चटणी सेवन करतात. ती पाने खाऊनच दिवसाची सुरवात करावी असे शास्त्र आहे.कडूनिंब कडू असूनही आपल्या सणउत्सावात त्याला मानाचे स्थान आहे कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हा महत्वाचा गुणधर्म कडूनिंबात आहे.हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जग्गनाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.
 
==औषधी महत्व==
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख गीते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी अ पोटातील कृमीवर कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.
 
कडूलिंबची झाडे जिते जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून,त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कडुलिंब" पासून हुडकले