"शार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
 
पचनतंत्राची सुरुवात मुखापासून होते. अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर इंग्रजी (J) आकाराचे असते. आतड्याच्या आतील बाजूस सर्पिल झडप असते. या झडपेमुळे अन्न शोषून घेण्यास अधिक वेळ मिळतो व शोषून घेणारा पृष्ठभाग वाढतो. आतड्यातील मलाचे अवस्करात उत्सर्जन होते. श्वसन तंत्रात क्लोम-दरणाच्या पाच (काहींत सात) जोड्या असतात. मुखात घेतलेले पाणी क्लोम पटलिकांवरून वाहत जाऊन मागील बाजूने बाहेर पडते. त्या वेळी पाण्यातील ऑक्सिजन रक्तात शोषून घेतला जातो व रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू पाण्यातून बाहेर टाकला जातो. शार्कमध्ये वाताशय नसते. उत्सर्जन क्रिया दोन वृक्कांमार्फत केली जाते. रक्तातील यूरिया तर्षण दाब समतोल राखतो. अंत:स्रावी ग्रंथी शरीराच्या विविध क्रिया - प्रक्रियांचे नियमन करतात. मेंदू व मेरुरज्जू या दोन्हींची मिळून केंद्रीय तंत्रिका तंत्र बनते. मेंदूत अग्रभागी दोन्ही बाजूंस गंधखंड, दाने प्रमस्तिष्क, दोन दृष्टिखंड, लंबमज्जा व खालील बाजूस निमस्तिष्क असे भाग असतात. मेंदूतून दहा मस्तिष्क तंत्रिकांचा उगम होतो. दृष्टी, श्रवणशक्ती, घ्राणेंद्रिये इत्यादींची संवेदना केंद्रे मेंदूमध्ये निरनिराळ्या ठिकाणी असतात.
 
==शार्कमध्ये पुढील प्रकारची संवेदांगे असतात==
*डोळा : याचे भिंग गोलाकार असते. भिंग व जालपटल यांतील अंतर कॅमेऱ्याप्रमाणे कमी-जास्त होते. जालपटलाच्या मागे टपेटम नावाचा चकाकणारा लेप असतो. खोल पाण्यात या लेपामुळे त्यांना दिसू शकते.
 
*श्रवणेंद्रिय : हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात व तोल सांभाळण्यासाठी मुख्यत: होतो.
 
*घ्राणेंद्रिये : मुखाच्या वरच्या बाजूस घ्राणेंद्रियाची दोन रंध्रे असतात. गंधज्ञानाबद्दल शार्क प्रसिद्धच आहेत. त्यांना लांब अंतरावरून भक्ष्याची चाहूल लागते.
 
*त्वचा : स्पर्शाची जाणीव करून देणारे तंत्रिका तंतू त्वचेखाली सर्व शरीरभर पसरलेले असतात. तापमानातील अतिसूक्ष्म फरकही त्यांना जाणवू शकतात.
[[वर्ग:मासे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शार्क" पासून हुडकले