"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{Reflist}} -->> {{संदर्भयादी}} (via JWB)
ओके
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ५९:
== हिंदवी स्वराज्य ==
 
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर दादोजी कोंडदेव, [[श्यामराज रांझेकर]], [[बाळकृष्णपंत हणमंते]], [[रघुनाथ बल्लाळ अत्रे]], [[कान्होजी जेधे नाईक]] व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
 
शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने [[बाजी घोरपडे]], [[मंबाजी भोसले]], [[बाजी पवार]], [[बाळाजी हैबतराव]], [[फतहखान]], [[आझमखान]] यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, [[इ.स. १६४८]] चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, [[इ.स. १६४९]] रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.