"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्रचना
No edit summary
ओळ १:
{{उल्लेखनीयता}}
 
==ओळख==
द.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले (जन्म : ८ मे, इ.स. १९३५) हे एक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित झाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्र्‍य हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. शहरातील बकालपणावरही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही असतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत.