"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
→‎इतर इतिहास: माहितीत भर घातली.
ओळ ७२:
संगमनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
[[पेशवाई]]तील प्रसिद्घप्रसिद्ध [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]], याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
 
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले