"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+ मजकूर
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
रामोशी हा रामवंशी या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे मानण्यात येते. रामोशी ही महाराष्ट्रातील एक लढवय्यी क्षत्रिय जमात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत अनेक गड किल्ल्यांची जबाबदारी या जमातीकडे होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या यशाचा मानकरी बहिर्जी नाईक या जमातीतील होता. विश्वासू, प्रामाणिक आणि शूर म्हणून या जमातीची इतिहासात नोंद आढळते. उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम या जमातीनेच इंग्रज राजवटीविरुद्ध बंड केल्याची नोंद आहे. भारतात फाशी दिले गेलेले उमाजी नाईक हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ही जमात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात बेरड अथवा बेडर, तलवार, नायका किंवा नाईक नावानेही ओळखली जाते. दक्षिणेतील मध्युयगीन काळातील विजयनगर साम्राज्यातील नायका राजा या जमातीतीलच होता. महाराष्ट्रात रामोशी, बेरड अथवा बेडर जमातीचे प्राबल्य प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळते.
रामवंशी शब्दाचा हा अपभ्रंश. यांना बेरड असेही नाव आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/रामोशी" पासून हुडकले