"वेरूळ लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर [[शैव]] संपद्रायाचा प्रभाव आहे.{{संदर्भ}} या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन [[शिल्पकला|शिल्पकले]]चा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.
 
भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. [[पुराणे|पुरा]]णातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत.जगभरातील लाखो पर्यटक या लेण्यांना भेट देतात.हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.
 
दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी [[बुद्ध]]मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा [[जैन]] पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.