"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात (2)
No edit summary
ओळ २४:
}}
'''अहमदाबाद''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] [[राज्य|राज्यातील]] सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. हे [[गुजरात]] राज्याची सांस्कृतिक [[राजधानी]] आहे असेही म्हंटले जाते. [[साबरमती नदी]]च्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव ''कर्णावती'' आहे. हे शहर [[अहमदशाह पहिला, गुजरात|अहमदशाहने]] स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. [[विक्रम साराभाई]] यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
 
==विशेष==
 
अहमदाबाद शहर अतिशय पसरलेले असून जवळपासच्या अनेक गावांना या महानगरपालिकेने सामावून घेतले आहे. अहमदाबाद जवळच गांधीनगर हे जुळे शहर राज्याची राजधानी म्हणून वसवले गेले.
बी आर टी ( बस रापीड ट्रान्स्पोर्ट) हि संकल्पना यशस्वी पणे राबवणारे अहमदाबाद हे एकमेव शहर आहे.
 
 
==पर्यटन स्थळे==
अहमदाबाद हे पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम शहर आहे. अहमदाबाद शहरात अनेक ऐतिहासिक तसेच आधुनिक पर्यटन स्थळे आहेत
 
१) '''साबरमती आश्रम''' - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे ठिकाण.
 
२) '''रिव्हर फ्रंट''' - साबरमती नदीच्या काठी असणारा काही भाग विद्यमान सरकारने सुशोबित केला आहे. दर वर्षी जानेवारी मध्ये होणारी आंतराष्ट्रीय पतंग स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते.
 
३) '''कांकरिया तलाव''' - गावात असणारा हा मोठा तलाव सुशोभित करण्यात आला आहे. तलाव काठी नौकानयन, अम्युझमेंट राईडस, फुलपाखरू उद्यान, छोटी रेल्वे अशा अनेक सुविधा आहेत.
 
४) '''सरखेज रोझा''' - अहमदशाह ज्याच्या नावाने अहमदाबाद ओळखले जाते त्याचा हा राजधानीचा परिसर. राजाचे गुरु शेख अहमदशाह गंज बक्ष यांचा दर्गा येथे आहे.
 
५) '''अडालज वाव''' - वाव म्हणजे पायर्यांची विहीर. गांधीनगर जवळ असणाऱ्या अडालज गावामध्ये हि हजार वर्षे जुनी विहीर आहे. साधारण पाच मजले असणारी हि विहीर पर्यटकांचे आकर्षण आहे.
 
६) '''अक्षरधाम मंदिर''' - स्वामीनारायण पंथांचे साधारण ३० एकर परिसरात पसरलेले हे सुरेख मंदिर पाहण्यासारखे आहे. स्वामी नारायण पंथाचे आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगाचे चित्रप्रदर्शन पाहण्या सारखे आहे.
 
७) '''कालुपूर स्वामी नारायण मंदिर''' - कालुपूर या मुख्य अहमदाबाद गावातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिरातील लाक्दावारचे कोरीव काम अतिशय सुंदर आहे.
 
८) '''सायन्स सिटी''' - राज्यातील विद्यार्थ्यांना शास्त्र आणि गणित अश्या विषयांची गोडी लागावी तसेच राज्यात विज्ञान तंत्रज्ञानाला पोषक वातावरण असावे म्हणून सोला या उपनगरात सायन्स सिटी ची स्थापना करण्यात आली. २०१७ सालची २५वि राष्ट्रीय बाल विज्ञान सभा येथे भरवण्यात आली होती. या सिटी मध्ये आय-मक्स तंत्रज्ञानाने चालवले गेलेले चित्रपट गृह आहे.
 
==उत्सव==
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले