"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मोहन विष्णू जोशी''' (जन्म : बंगलोरबंगरुळु, १२ जुलै, इ.स. १९५३) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. (इ.स. २०१५)
 
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. नाटके करणे सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले