"दोलामुद्रित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''दोलामुद्रित''' ही संज्ञा मराठी भाषेत Incunable ह्या संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. दोलामुद्रित म्हणजे मुद्रणाच्या प्रारंभीच्या काळात प्रकाशित झालेला ग्रंथ. ग्रंथमुद्रणाचा प्रारंभ जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात झालेला असल्याने दोलामुद्रिताची कालमर्यादाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. मराठी मुद्रित पुस्तकांच्या संदर्भात ही मर्यादा १८६७अखेरपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे {{sfn|प्रियोळकर|१९४९| p=(१३)}}. दोलामुद्रित ह्याप्रमाणे '''आद्यमुद्रित''' अशी संज्ञाही वापरण्यात आली आहे.
 
== व्युत्पत्ती ==
दोलामुद्रित ही संज्ञा ज्या incunable ह्या इंग्लिश संज्ञेवरून घेण्यात आली आहे तिचे लॅटिन मूळ cunae असे असून त्याचा अर्थ पाळणा असा आहे. संस्कृत भाषेत पाळण्याला दोला असे म्हणतात त्यावरून पाळण्यातले मुद्रित ह्या अर्थी मराठीत दोलामुद्रित ही संज्ञा वापरण्यात आली आहे
{{Sfn|प्रियोळकर|१९४९|p=(१२)}}
.
 
==संदर्भ==