"सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सरदेसाई हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये...
(काही फरक नाही)

१०:२६, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

सरदेसाई हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते.

इतिहास

या घराण्याचे मूळ पुरुष नृसिंहभट सत्यवादी हे मुळचे गोदावरी नदीकाठी वसलेले पैठणचे रहिवासी होते. त्यास पुत्र नव्हते, म्हणून ते तीर्थयात्रेला बाहेर पडले. फिरताना ते कोकणात संगमेश्वर नजीक मावळंगे या गावी आले. तेथील नरसिंह देवस्थानात त्यांनी तपश्चर्या केली. ईश्वरी कृपेने त्यांना पुत्र झाला. त्यांचे नातू दुसरे नृसिंहभट यांस कोल्हापूरच्या शिलाहार राजा विजयार्क यांनी चालुक्यांचा कोकणातील राजधानीचा गाव संगमेश्वर हा इनाम दिला. हि घटना इ.स.११८५ च्या सुमाराची असावी.[१]

  1. ^ कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास-लेखक-कै.विष्णू वासुदेव आठल्ये- राहणार शिपोशी, तालुका लांजा, पुस्तक प्रकाशन-इ.स.१९४७