"लसूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 109 langlinks, now provided by Wikidata on d:Q23400
छोNo edit summary
ओळ ६:
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये [[चीन]]चा पहिला तर [[भारत|भारताचा]] दुसरा क्रमांक लागतो.
 
=== उपयोग ===
लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
 
समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला....
 
तो थेंब पुथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला .....
 
गंमतीशीर आहे पण आमच्या घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट मल आजही जशीच्या तशी आठवते ....
 
खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा अशी खात्री मला झाली आहे ....
 
गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे ...
 
संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा ...
 
लसणाचे उपयोग :
 
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
 
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
 
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
 
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
 
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
 
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफअसूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
 
७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
 
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
 
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
 
१०. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
 
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
 
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
 
१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
 
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ....
 
=== काळजी : ===
लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे .....
 
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...
[[वर्ग:कंदमुळे]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लसूण" पासून हुडकले