"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ९४:
 
*अध्यापनाचे साधन (As a pedagogical tool)
औपचारिक शिक्षण पद्धतीत निबंध हे एक महत्वाचे साधन बनले.माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची लेखनशैली सुधारावी यासठी त्यांना साचेबद्ध पद्धतीचे निबंध लेखन करायला शिकविले जाते.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात भाषेचे आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो.निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना स्पष्टीकरण , टीका यापद्धतीने एकाद्या विषयावर मत नोंदविण्यास सांगितले जाते.अभ्यासक्रमात विशेषत विद्यापीठीय विद्यार्थ्याना दीर्घ निबंध लिहायला सांगितले जातात ज्यासाठी काही महिने वा आठवडे तयारी करावी लागते.या जोडीने मानवहितवाद आणि सामाजिक शास्त्रे यांच्या अभ्यासक्रमाच्या सहामाहीत अथवा वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्याना दोन ते तीन तास बसून एखादा निबंध लिहावा लागतो. साहित्यिक अंगाने लिहिल्या जाणा-या निबंधांपेक्षा अभ्यासावर अथवा संशोधनावर आधारित 'शोधनिबंधाचे' स्वरूप वेगळे असते.यामध्ये लेखकाला स्वत:ची मते नोंदविता येतात तथापि ती प्रथम पुरुषी असू नयेत आणि त्याला संबंधित संदर्भांची जोड देवून तर्कपद्धतीने त्यांची मांडणी केली जाते.क्रमिक दीर्घ निबंध (ज्यांची शब्दमर्यादा २००० ते ३००० इतकी असते ते बरेचदा विषयांतर करणारे ठरू शकतात.अशा निबंधात काही वेळा प्रारंभी ' त्या विशिष्ट विषयावर पूर्वी झालेल्या अभ्यासाचा आढावा ' सारांश रूपाने नोंदविला जातो. दीर्घ निबंधात ब-याच वेळा प्रस्तावनेच्या पानाचा समावेश असतो ज्यामध्ये निबंधाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण आणि संकल्पना नेमकेपणाने नोंदविलेल्या असतात.बहुतेक सर्व शैक्षणिक संस्था याचा आग्रह धरतात की निबंधाचा विषय मांडताना पुरावा म्हणून जी उद्धरणे,साधने, संदर्भ मांडलेले असतील ते निबंधाच्या शेवटी 'संदर्भ ग्रंथ सूची ' किंवा 'संदर्भ सूची'या सदराखाली नोंदविले जावेत.यामुळे एखाद्या अभ्यासपूर्ण निबंधाची सत्यता पटणे, त्याची मुद्द्यांची शहानिशा करणे सोपे जाते तसेच त्या निबंधाचा वापर जे शिक्षक किंवा अभ्यासक करतात त्यांना त्या निबंधातील विचारामागील मूळ संदर्भ समजणे सोपे जाते व त्याआधारे त्या विचाराचे वा संकल्पनेचे मूल्यमापन पद्धतशीरपणे करणेही सोपे जाते.अशा प्रकारच्या अभ्यासाधीष्ठित निबंधामुळे विद्यार्त्यांचेविद्यार्थ्यांना त्यांची विचारप्रक्रिया त्यांना पद्धतशीरपणे मांडता येते का हे पाहिले जाते तसेच त्याच्या बौद्धिक क्षमतेचीही कल्पना येते.
 
एका विद्यापीठीतील प्रबंध मार्गदर्शकाने शोध निबंध आणि चर्चात्मक निबंध असा भेद नोंदविला आहे.शोध निबंधात संबंधित विषयाच्या बाबतीत आवश्यक अशा विषयाची व्याप्ती वैविध्यपूर्ण असू शकते.त्याची लांबी मोठी असू शकते आणि संबंधित विषयाची भरपूर माहिती त्यात समाविष्ट असू शकते. चर्चात्मक निबंधता मात्र अधिक नेमकेपणा असतो आणि त्यात संशोधनही असते.पण तो अधिक तार्कीक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. विद्यापीठाच्या कामात येणारी एक समस्या म्हणजे बरेचसे विद्यार्थी स्वत: काम करण्याऐवजी काही लोकांकडून असे निबंध विकत घेतात.अशा प्रकारची फसवणूक किंवा वांग्मयवाङमय चौर्य अपेक्षित नसल्याने अशा संशयास्पद निबंधांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर संगणक प्रणाली आधारे हे काम तपासून घ्यावे लागते.
 
==प्रकार, पद्धती आणि शैली==
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले