"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो. 
 
प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हींचा परिपाक म्हणजे हा गायनप्रकार होय, तेराव्या शतकातील सूफी संत ⇨''ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती '' व खल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी ⇨''अमीर खुसरौ''  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर याच्या पदरी ⇨''गालिब''  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर असून स्वतः जफर एक प्रसिद्ध शायर होता.
 
गझल हा एक [[वृत्त|वृत्ताचा]], [[कविता|काव्याचा]] आणि [[गायन|गायनाचा]] प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6975</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गझल" पासून हुडकले