"महाराष्ट्राचा चित्ररथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २६ जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे भारता...
 
No edit summary
ओळ १:
२६ जानेवारी या [[भारत|भारताच्या]] प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ’राजपथा’वरून एक मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत सैनिकांचे आणि अन्य गटांचे संचलन होते. भारतातील विविध राज्येय आपापली संस्कृती दर्शविणारे चित्ररथ या मिरवणुकीत सामील झालेले असतात.
 
इ.स. १९५६ साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी नव्हता. १९८०मध्ये शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास प्रथमच अव्वल पारितोषिक मिळाले. त्यानंतर १९८३मध्ये बैलपोळा विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला. १९९३ ते १९९५ ही सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव शताब्दी, हापूस आंबे व बापू स्मृती या विषयांवरील चित्ररथांनी देशात प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक महाराष्ट्राने केली. इ.स. १९८६, १९८८, व २००९मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्‍यात हुकला होता.