"ई-कचरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ६:
ई-कचरा हा आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो. पूर्वी मोठ्या आकाराचे कॉम्प्युटर आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा स्लिम कॅबिनेट आणि फ्लॅट मॉनिटर्सनी घेतली आहे. माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही ‘ई-कचरा’ या प्रकारात येतात. जुन्या डिझाइन्सचे कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हासुद्धा ई-कचराच. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात ई-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.

वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचर्‍याचे व्यवस्थापन करुन तो नष्ट करण्यासाठी २००८मध्ये काही नियम बनवले होते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात (?) वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ई-वेस्ट मॅनेजमेंट अॅन्डॲन्ड हँडलिंग कायद्याची अधिसूचना मांडली होती. तिच्या संदर्भात संबंधित व्यावसायिक आणि ग्राहक यांना माहिती देण्यासाठी एक वर्ष वेळ देण्यात आला होता.

आता टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर डंप केला, तर त्यासाठी दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट अॅन्डॲन्ड हँडलिंग) कायदा-२००० लागू झाला आहे.

या कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही नागरिक त्याचेर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणार्‍या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणार्‍या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे. या कायद्याअंतर्गत ई-कचरा एकत्र करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना या कायद्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत.

भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे एक प्रमुख केंद्र क्षेत्र बंगलोरमध्ये आहे. या शहरात सुमारे १७०० आयटी कंपन्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ६००० ते ८००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा बाहेर पडतो.

"https://mr.wikipedia.org/wiki/ई-कचरा" पासून हुडकले