"कलश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेदेखील पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छोNo edit summary
ओळ ३:
आपले पूर्वज जीवनात भावनेला प्राधान्य देत असत. भावपूर्ण जीवन म्हणजेच वैदिक जीवन. म्हणूनच आपले पूर्वज सूर्याला नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची पूजा करीत होते. तसेच पाऊसाला वरुण देव समजून त्याची पूजा करीत होते आणि कलश हे वरुण पूजनाचेच प्रतिक आहे. <br>
 
मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त चारच महिने येतो, तो देखील रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहिर, तलाव, नदी इ. सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. तेव्हा त्यांनी कलशात ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरु केली. <br>
 
वरुणदेवाचे प्रतीक म्हणून पूजा करताना कलशात पाणी, हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले व कापूर घालण्याची प्रथा आहे असे मानले जाते.<br>
 
कलशाला जरा व्यापक केले म्हणजे तो कुंभ बनतो. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील आहे. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे. <br>
"https://mr.wikipedia.org/wiki/कलश" पासून हुडकले