"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Manusmriti.jpg|इवलेसे|मनुस्मृती]]
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटीश काळात इ.स.१७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.
मनुस्मृती हा इसवी सनाच्या २र्‍या शतकात लिहिलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात विश्वोत्पत्ती, आहार, आरोग्य, गुरु-शिष्य संबंध, अध्ययन आणि अध्यापन विषयक नियम, गौरव, स्त्री-संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वाहतूक नियम, प्राणिहत्या, शासकीय सेवा, राजधर्म, धनसंचयाचे नियम अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
मनुस्मृतीच्या आज ५० हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते.
 
मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हे मनु आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम v अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे.
मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थाईलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया मध्ये देखील झाला होता.
मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते.
== अध्याय ==
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.