"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
कोरफडीचे अनेक उपयोग तुम्हांला माहीत असतील. परंतु, कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो हे ठाऊक आहे का ? कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फोलिक अॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.
वजन घटण्यास मदत होते –
कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.
शरीर डिटॉक्स करते –
कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. कोरफडीमध्ये अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिन्स हे शुद्धतेचे प्रभावी घटक असतात. आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते –
सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. याच्यातील अँटि-वायरल आणि अंटि-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे श्वसनाच्या इंन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटि-हिस्टॅमिनप्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते.
संधिवाताच्या वेदना कमी करते –
कोरफडीच्या रसामुळे आमवाताच्या (रुमेटाइड अर्थ्रायटिस) रुग्णांना होणाऱ्या वेदना व सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते. कोरफडीमधील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
पचनक्षमता वाढवते–
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते.
योनीसंक्रमणास प्रतिबंध करते –
योनीजवळ संक्रमण झाल्यास कोरफडीच्या रसाने त्यावर उपचार करता येतो. कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.
दातांचे आरोग्य सुधारते –
नियमितपणे कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे आरोग्य सुधारते, हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते, तसेच प्लाकची निर्मिती रोखण्यास मदत होते. तोंड आलेले असल्यास कोरफडीचा रस तोंडाला लावावा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते –
कोरफडीच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘के’, अमिनो अॅसिड आणि फायटोन्यूट्रिन्स यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे इंन्फेक्शनपासूनही बचाव होतो
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले