"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा (2)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|250px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]]
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|पांचालाच्या]] राजा [[द्रुपद|द्रुपदाची]] दत्तक कन्या व पाच [[पांडव|पांडवांची]] पत्नीपत्‍नी होती. महाभारतीयमहाभारत युद्धानंतर [[कौरव|कौरवांवर]] विजय मिळवून [[युधिष्ठिर]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा बनल्यावर द्रौपदी पट्टराणी झाली.
 
== जन्म ==
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवुनहरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. धृष्टध्युम्न व द्रौपदी यांना अयोनिसंभव असे म्हणत - म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यांचा जन्म झाला नाही असे. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.
 
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
ओळ १२:
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नीपत्‍नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
 
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण ==
ओळ २२:
 
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात ==
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्नप्रयत्‍न कौरवांचा मेव्हणा व [[दु:शलादुःशला|दु:शिलेचादुःशलेचा]] पतिपती [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठीरामुळेयुधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासामधेअज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. सैरंध्रीच्या रूपात [[विराट]] राजाची पत्नीपत्‍नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला.
 
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्युतप्रसंगीद्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, जी त्याने महाभारताच्या युद्धात पूर्ण केली. वनवासामधेवनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणार्‍या [[कीचक|कीचकाचा]] वध करण्याचं काम भीमानेच केलंकेले होतंहोते.
 
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]] -पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहूटीमधेराहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
 
==द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेवर अनेक पुस्तके लिहिली गेली; त्यांपैकी काही ही :-
* द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय)
* द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा)
* पांचाली (लेखिका - डॉ. [[सुमती क्षेत्रमाडे]])
* पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर)
* सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती)
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले