"कोइंबतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ २६:
'''कोइंबतूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[चेन्नई]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व [[कोइंबतूर जिल्हा|कोइंबतूर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात [[सह्याद्री]]चा भाग असलेल्या [[अनामलाई पर्वतरांग|अनामलाई]] व [[निलगिरी पर्वतरांग]]ेच्या पायथ्याशी वसले आहे. [[पालक्काड खिंड]] कोइंबतूर व तमिळनाडूला [[केरळ]] राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर [[चेन्नई]]पासून ५०० किमी, [[बंगळूर]]पासून ३१० किमी तर [[पालक्काड]]पासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. [[उदगमंडलम|उटी]] हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.
 
येथील [[कापूस]] उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला [[दक्षिण आशिया]]चे [[मँचेस्टर]] असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने औद्योगिकरण झाले व आजच्या घडीलासध्या ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.
 
==वाहतूक==
[[कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] शहरापासून १५ किमी अंतरावर असून तो भारतामधील १८व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. आजच्या घडीलासध्या येथून केवळ देशांतर्गत प्रवासी वाहतूक चालवली जाते. [[कोइंबतूर रेल्वे स्थानक]] [[दक्षिण रेल्वे]]वरील [[चेन्नई सेंट्रल]]खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून चेन्नई, [[दिल्ली]], [[मुंबई]], [[बंगळूर]] इत्यादी अनेक शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] असलेली [[निलगिरी पर्वतीय रेल्वे]] कोइंबतूरच्या मेट्टुपलयम ह्या उपनगरापासून उटीपर्यंत धावते.
 
[[राष्ट्रीय महामार्ग ४७]], [[राष्ट्रीय महामार्ग ६७|६७]] व [[राष्ट्रीय महामार्ग २०९|२०९]] हे तीन राष्ट्रीय महामार्ग कोइंबतूरमधून जातात. कोइंबतूर शहरामधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी येथे [[मोनोरेल]] मार्गाचे प्रस्तावन करण्यात आले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोइंबतूर" पासून हुडकले