"शेतकरी कामगार पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''शेतकरी कामगार पक्ष''' हा एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[राजकीय पक्ष]] आहे.
आमदार भाई जयंत पाटील पक्षाचे सरचिटणीस आहेत.
आमदार भाई जयंत पाटील हे महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख(सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), श्रीमती मीनाक्षीताई पाटील(अलिबाग), भाई धैर्यशील पाटील(पेण) हे विधानसभेवर पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. भाई गणपतराव देशमुख हे तब्बल ५० वर्षे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ते १९६२ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत.
महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह इतर ५ जिल्हा परिषदांमध्ये(नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर ) पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत तसेच खोपोली, पनवेल मध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत.
शेकापच्या जन्माची पाश्वभूमी...
1946 च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात शंकरराव काँग्रेस अंतर्गत कार्य करणा-या सहका-यांना मोरे यांनी आपली खंत बोलून दाखविली. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना आणि निवडणूक जाहिरनाम्यातील बचतांना हरताळ फासलेला आहे. काँग्रेस सरकार हे भांडवल दारांचे हीत पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम पाहत आहे. यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल.” उपरोक्त संत व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात 11-09-1946 रोजी शंकरराव मोरे यांनी त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतर काही आमदारांच्या मदतीने ‘शेतकरी -कामकारी संघ’ स्थापन केला. सदर ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापनेनंतर काँग्रेसमधील मोरे यांच्या विरोधकांनी टिकास्थ सोडले. त्यावेळेस ‘नवयुग’ सारख्या साप्ताहिकांमधून शंकरराव मोरे यांनी आपल्या लेखणीने त्यांना चोख उत्तर दिले. यानंतर दिनांक 11-01-1947 रोजी फणसवाडी येथील शंकररावजी मोरे यांच्या बंगल्यात पुनश्र्च एकदा काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष” स्थापनेस प्रखर विरोध केला होता.या विरोधाने खचून न जाता पूण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहीते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला. परिणामे 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी शंकररावजी मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ऐतिहासिक बैठक घेतली. याच बैठकित आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.