"गायत्री देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Gayatri1.jpg|इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले गायत्री देव...
 
No edit summary
ओळ ३:
 
== गायत्रीचे वर्णन ==
वैदिक संध्याविधीतील गायत्री ध्यानाच्या श्लोकात गायत्रीचे वर्णन दिसून येते.
गायत्री देवीला प्रत्येक मुखाला तीन डोळे असतात. चंद्रकलेने युक्त असा प्रत्येक मुकुट असतो. मोती, पोवळी, सोने, इंद्रनील व धवल अशा वर्णांची पाच मुखे असतात. तिला दहा हात असून त्या हातात वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबूक, शूल, कपाल, रज्जू, शंख, चक्र व कमळांची जोडी असते. ती ब्रह्मप्रतिपादक आहे.
=== बाल्यावस्थेतील गायत्री ===
 
प्रातःकाळी गायत्री बाल्यावस्थेत असून ती उदयकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे रक्तवर्णाची(लाल)असतात. तिला चार मुखे असतात. चार हात असून त्या हातात दंड,कमंडलू,वक्षसूत्र व अभयचिन्ह असते. ती ब्रह्मस्वरूपी असून हंसावर बसलेली असते. ती ऋग्वेदाचे पठण करत असून भू-लोकाची नियंत्रक असते.
 
=== युवावस्थेतील गायत्री ===
मध्यान्हकाळी गायत्री युवावस्थेत असून ती मध्यान्हकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्वेतवर्णाची(पांढरा)असतात. तिला चार मुखे असतात.प्रत्येक मुखाला तीन डोळे असून तिच्या मस्तकावर चंद्र असतो. चार हात असून त्या हातात त्रिशूळ, खड्ग, खट्वांग व डवरू असते. ती रुद्रस्वरूपी असून बैलावर बसलेली असते. ती यजुर्वेदाचे पठण करत असून भुव-लोकाची नियंत्रक असते.
 
=== वृद्धावस्थेतील गायत्री ===
 
सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.