"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा (2)
ओळ २४:
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कौरवांचा मेव्हणा व [[दु:शला|दु:शिलेचा]] पति [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठीरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासामधे द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. सैरंध्रीच्या रूपात [[विराट]] राजाची पत्नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
 
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्युतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, जी त्याने महाभारताच्या युद्धात पूर्ण केली. वनवासामधे तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पाहाणार्‍यापहाणार्‍या [[कीचक|कीचकाचा]] वध करण्याचं काम भीमानेच केलं होतं.
 
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]] पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहूटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
 
== हेही पाहापहा ==
* [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले