"सरासरी यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग टाकले
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
सरासरी यामिकी ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा आहे ज्यामध्ये [[संभाव्यता सिद्धांत|संभाव्यता सिद्धांताचा]] उपयोग करून अशा यामिकीय संहतींच्या वर्तणाचा अभ्यास केला जातो ज्यांची स्थिती पुर्णपणे निश्चित नाही किंवा ज्या संहति इतक्या किचकट आहेत की संपुर्णपणे ज्यांच्या वागणुकीचे गणितीय वर्णन शक्य नाही (किंवा दोन्ही). अशा संहतीचे साधे उदाहरण म्हणजे एखाद्या बंद खोक्यामधे असलेला वायु. हा वायु प्रचंड संख्येच्या रेणुंचा समुह आहे. परंतु या सर्व रेणुंची स्थिती आणि गती कोणत्याही एका क्षणी जाणुन घेणे अशक्य तर आहेच परंतु या वायुचा अभ्यास करण्यासाठी ते आवश्यक देखिलदेखील नाही. यातील प्रत्येक रेणु हे यामिकीचे साधे नियम पाळतो आणि तो खोक्याच्या भिंतिंबरोबर आणि इतर रेणुंबरोबर अन्योन्यक्रिया करतो. परंतु रेणुंची संख्या प्रचंड असल्याने यामिकीचे नियम जसेच्या तसे लावुन या खोक्यातिल वायुचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे.सरासरी यामिकी अशा संहतींचे सरासरी वर्णन करण्याची सोय आपल्याला करून देते.
 
[[वर्ग: भौतिकशास्त्र]]