"आग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३४:
अकबरने आग्र्यामध्ये लाल किल्ला व आग्र्याबाहेर फतेहपूर सिक्री ह्या वास्तू बांधल्या. [[शाह जहान]]ने आपली दिवंगत पत्नी [[मुमताज महल]] हिच्या स्मरणार्थ मोठे स्मरक उभारण्याचे ठरवले व यमुनेच्या काठावर १६५३ साली [[ताजमहाल]] बांधून पूर्ण झाला. १६८९ साली शाह जहानने राजधानी शाहजहानाबाद (जुनी दिल्ली) येथे हलवली.
 
शाहजहानचा मुलगा [[औरंगजेब]] ह्याने बापाला कैदेत टाकून सत्ता बळकावली व मुघल साम्राज्याची राजधानी पुन्हा आग्र्याला आणली. १६६६ मध्ये औरंगजेबाने [[शिवाजी महाराज]]ांना भेटीसाठी आग्र्याला बोलावले. १२ मे १६६६ रोजी औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या कनिष्ठ सरदारांच्या मागे उभे केल्यामुळे महाराज खवळले व त्यांनी दरबार सोडण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाने त्यांना त्वरित अटक करवून कैदेत टाकले. ३ महिने कैदेत राहिल्यानंतर शिवाजी महाराज पुत्र संभाजीसह १७ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटाऱ्यांत लपून कैदेमधून पळाले. [[आग्र्याहून सुटका]] हा महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.
 
मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १८०३ साली आग्रा [[ब्रिटीश राज]]वटीखाली आले. १८३५ मध्ये ब्रिटिशांनी येथे आग्रा प्रांताची निर्मिती केली. १९४७ मधील भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजधानी दिल्लीच्या जवळ स्थित असल्यामुळे आग्र्याचे राजकीय महत्त्व कायम राहिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/आग्रा" पासून हुडकले