"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची नित...
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची नित...
ओळ ७:
===प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची निती ===
* स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, '''शक्यतोवर [[:commons:Special:UploadWizard|विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातून]]च चढवाव्यात. <ref group="असे का?">१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते<br /> २) कारण [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते. <br /> ४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.<br /> ५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही. </ref>
** '''अपवाद १.''': [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने [[विपी:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली <ref group="असे का?">केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.</ref>संचिका चढवायला हरकत नाही.
** '''अपवाद २''': विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे नकाशे मराठी विकिपीडियावर आणताना अधिक सुरक्षितता बाळगणे.
** आधीपासून चढवलेल्या ज्या संचिकांना व्यवस्थित परवाने नाहीत, किंवा निर्मात्याव्यतिरिक्त ज्या इतर व्यक्ती/बॉट यांनी परवाने डकवले आहेत, अशा सर्व सदस्यांनी सर्वमाध्यमी अभियान राबवून परवाने अद्ययावत करवून घ्यावेत. सुयोग्य परवाने मिळवून, चढवणे शक्य असलेल्या संचिका विकिमीडिया कॉमन्सवर स्थानांतरित कराव्यात.
** सामान्य सदस्यांत प्रताधिकारासंबंधीचे कायदे आणि परवाने यांविषयक सजगता विकसित होईपर्यंत, सदस्यांना मराठी विकिपीडियावर छायाचित्र चढवण्यास मान्यता देण्यासाठी काही किमान निकष असावेत. उदाहरणार्थ, मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी करता येईल) आणि विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा.