"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

* क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction): कॉपीराईट विषयक एखादी केस कोणत्या कोर्टाच्या हद्दीत येते हा विषय न्यायालयीन प्रक्रीयेच्या सुरवातीस महत्वाचा समजला जातो. एकपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पक्ष असल्यास, हा विषय अंशत: जटील होऊन हे ठरवताना न्यायालये विभीन्न गोष्टी विचारत घेऊ शकतात. जिथे आंतरराष्ट्रीय केस असेल त्यात एक उपविषय 'कायद्याची निवड' (choice of law) असा असतो, खास करून एकपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पक्ष आपापसातील विशीष्ट कराराने बद्ध असतील किंवा स्वत:ची अट लादण्याची संधी असेल तर टर्म्स ऑफ यूजच्या माध्यमातून केले जाताना दिसते, विवाद झाल्यास तो कोणत्या देशातील कायद्यान्वये आणि क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्रात व्हावा या बद्दल अशा करारात नेमके काय नमुद केले आहे अथवा काहीही नमुद केले नाही याची नोंद न्यायालये घेतात. वादी आणि प्रतिवादी कोणत्या देशातील डोमीसाईल आहेत, उल्लंघन अथवा तक्रार कोणत्या देशात निर्मित झाली आहे, आंतरजालाच्या बाबतीत ॲक्सेस कोणकोणत्या देशातून केला गेला, नियमभंग असेल तर नियमभंग कोणकोणत्या देशातून केले गेले अशा अनेक बाबी असतात. प्रत्येक देशाच्या कायद्यांच्या आणि न्यायालयीन प्रक्रीयेतील बारकाव्यांनुसार आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांमुळे थोडाफार फरक पडतोच परंतु बौद्धीक संपदा कायद्यांची रचना सर्वसाधारण पणे आंतरराष्ट्रीय करारांना अनुसरून असते त्यामुळे वादी अथवा प्रतिवादींनी मनावर घेतल्यास (कालापव्यय झाला तरी) दावा कोणत्या न कोणत्या न्यायालयापुढे येऊ शकतोच. {{संदर्भ हवा}}
 
:जिथ पर्यंत विकिमिडीया फाऊंडेशनचा संबंध आहे त्यांच्या वापरण्याच्या अटीत नमुद केले त्या प्रमाणे state or federal court located in San Francisco County, California. आणि विकिमिडीया फाऊंडेशन शक्यतोवर तेथील कायद्यांच्या कक्षेत येतील असे सहाजिकच नमुद केलेले आहे. परंतु हि बाब विकिमिडीया फाऊंडेशनच्या स्वत:च्याच बाबतीत आहे. विकिमिडीयाची साईट्स वापरणाऱ्यांनी स्वत:च्या देशातील कायदे लक्षात घेत वापरावी वेबसाईट वापरकर्त्यांना स्वत:च्या देशातले कायदे मोडण्यात प्रोत्साहन देत नाहीच त्या शिवाय विकिमिडीया फाऊंडेशनची प्रताधिकार परवाना निती स्थानिय प्रकल्प निती वेबसाईट मुख्यत्वे ज्या देशातून ॲक्सेस केले जाते तेथील कायद्यास जुळणारी असावी असे सुस्पष्ट म्हणते. त्यामुळे मराठी भाषी विकिप्रकल्पांना सहाजिकपणे भारतीय आणि महाराष्टृ राज्यातील कायदे आणि भारतीय न्यायालयांचे निर्णय लागू होतात.
 
 
* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६]] भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये नमुद नसलेल्या गोष्टींवर प्रताधिकार लागणार नाही असे नमुद करते. चित्रे, छायाचित्रे, लेखन इत्यादींचा प्रताधिकार कायद्यात सुस्प्ष्ट समावेश असल्यामुळे त्यासाठीच्या बचावासाठी कलम १६चा आधार घेता येण्याची शक्यता सर्वसाधारणपणे कमी असावी. परंतु फॉण्ट्स आणि टाईपफेसेसवर कॉपीराईट लागणार की नाही, तसेच केवळ फॉण्ट्स आणि टाईपफेसेस वर आधारीत लोगोंच्या कॉपीराईट लागेल का नाही या बद्दल कलम १६ चा निकष महत्वाचा ठरतो.
* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६]]
 
* [[भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१]] : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुच्छेदांशिवाय, अनुच्छेद २१ ची व्याप्ती भारतीय न्यायालयीन प्रक्रीयेने वाढवून त्यात माहितीचा अधिकाराचा समावेश खालील शब्दात केला असला तरीही माहिती देणाऱ्यांच्या जबाबदार वर्तनाचे महत्वही अधोरेखीत केले आहे ज्यात अस्तीत्वातील कायद्यांच्या प्रक्रीयेच्या पालनाचा समावेश होऊ शकतो शिवाय हे प्रोव्हीजन भारतीय न्यायालये शब्दांची व्याख्या नव्याने करताना आढळून येतात पण कायदा बनवण्याच्या संसदेच्या कार्यक्षेत्रात आपल्याकडून हस्तक्षेप होत नाही आहे हे ही पहात असतात म्हणून हे प्रोव्हीजन [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६]] आणि [[भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१]] मध्ये न्यायालयांनी अनुस्यूत धरलेल्या खाजगीपणाच्या आधिकारांची ची दखल घेऊन वाचलेले बरे पडू शकते.
३३,१२७

संपादने