"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०८:
[[चित्र:Qutub minar.JPG|thumb|200px|left|[[कुतुबमिनार]]]]
{{main|दिल्ली सल्तनत}}
१२ व्या शतकात [[पृथ्वीराज चौहानचाचौहान]]चा [[मोहम्मद घौरी]]ने पराभव केला व भारतात अधीकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली.<ref>[http://www.sfusd.k12.ca.us/schwww/sch618/Ibn_Battuta/Battuta's_Trip_Seven.html Battuta's Travels: Delhi, capital of Muslim India]</ref> भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारतातील अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. [[शेरशहा सूरी]] ने बांधलेला [[राष्ट्रीय महामार्ग १|कलकत्ता काबूल]] रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले.
 
१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील [[तैमूरलंग]] या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.<ref>[http://www.gardenvisit.com/travel/clavijo/timurconquestofindia.htm Timur - conquest of India]</ref> त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=The History of India As told By Its Own Historians Vol III|लेखक=Elliot & Dawson |पृष्ठ=445-446 }}</ref> तैमूरलंग च्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये [[बाबर]] या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.