"दत्तात्रेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२:
[[गोरक्षनाथ|गोरक्षनाथाने]] अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांनाही]] पूज्य आहे. श्री [[ज्ञानदेव]] आणि श्री [[एकनाथ]] हे श्रेष्ठ दत्तोपासक होते. आनंद संप्रदाय गुरुपरंपरा दत्तात्रेयादी आहेत. चैतन्य संप्रदाय राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- [[तुकाराम]] अशी गरुपरंपरा आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक मुस्लिम भक्त असतात.
====आखाडे====
[[दशनामी नागा संप्रदाय|दशनामी नागा]] साधूंचे सहा मुख्य आखाडे हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील जुना आखाडा म्हणून ओळखला जाणारा आखाडा हा [[भैरव आखाडा]] म्हणूनही ओळखला जातो. या आखाडय़ाची देवता पूर्वी भैरव असावी त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखड्याची प्रमुख देवता आहे.
===उपासनेची वैशिष्ट्ये===
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते.सगुण प्रतीके उपलब्ध असलीतरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत.
==क्षेत्र==
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
[[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय यात महत्त्वाचे आहे. श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते. [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत.
* [[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय यात महत्त्वाचे आहे.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज असे दत्तस्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
[[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय यात महत्त्वाचे आहे.* श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते. [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत.
* नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्री ही राहिले होते. हे [[सांगली]] पासून चाळीस किलोमिटर्सवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[नृसिंहवाडी]] - [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असा एक मत प्रवाह आहे.
* [[अक्कलकोट]] - दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले अखेपर्यंत तेथेच राहिले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने परत अवतरले असे दत्तभक्त मानतात. सोलापूरनजीकच्या अक्कलकोटचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[विजापूर]]-विजापूरला आपल्याला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र - [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कोल्हापूर]] - दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले कुंभारस्वामी यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे.
== शिष्य व कार्य==
[[श्रीपाद वल्लभ]] व त्यांचे शिष्य [[नृसिंह सरस्वती]] हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तपंथाची पुनरुज्जीवन केले असे काही मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.