"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २:
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०८ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले