"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४८:
 
मार्च २०१३ मध्ये ६ वर्षांच्या कालावधीनंतर एअर इंडियाने आर्थिक सुधारणा दाखवली. २०१३-१४ वित्तीय वर्षादरम्यान एअर इंडियाचा तोटा ४४ टक्क्यांनी घटला असून मिळकतीमध्ये २० टक्यांनी वाढ झाली आहे.
 
==कंपनी रचना व कार्य==
===संस्था===
[[चित्र:Air-India-building.jpg|इवलेसे|मुंबईच्या [[नरिमन पॉइंट]] येथील [[एअर इंडिया बिल्डिंग]]]]
एअर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी एअर इंडियाची पालक कंपनी आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये एअर इंडिया व [[इंडियन एअरलाइन्स]]चे एकत्रीकरण झाल्यानंतर एअर इंडिया लिमिटेडच्या अधिपत्याखाली केवळ ३ कंपन्या आहेत.
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली| | | | |AIL| |AIL=एअर इंडिया लिमिटेड}}
{{वंशावली| | | | | |!| | }}
{{वंशावली|AI|-|IX|-|IC|AI=एअर इंडिया|IX=[[एअर इंडिया एक्सप्रेस]]|IC=[[एअर इंडिया रीजनल]]}}
{{वंशावली/अंत}}
 
एअर इंडियाचे मुख्यालय [[नवी दिल्ली]]च्या इंडियन एअरलाइन्स हाउस येथे आहे. २०१३ पर्यंत हे मुख्यालय [[मुंबई]]च्या [[मरीन ड्राइव्ह]]वरील [[एअर इंडिया बिल्डिंग]] ह्या प्रसिद्ध २३ मजली इमारतीमध्ये होते. १९७४ साली बांधून झालेली एअर इंडिया बिल्डिंग [[एस्कलेटर]]चा वापर करणारी भारतामधील पहिली इमारत होती.
===उपकंपन्या===
====एअर इंडिया रीजनल====
{{मुख्य|एअर इंडिया रीजनल}}
१९९६ साली इंडियन एअरलाइन्सची '''अलायन्स एअर''' ही कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी स्थापन केली गेली. एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण झाल्यानंतर अलायन्स एअरचे नाव बदलून एअर इंडिया रीजनल असे ठेवले गेले. दिल्लीच्या [इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर हब असणारी एअर इंडिया रीजनल भारतातील २५ शहरांना सेवा पुरवते. सद्य घटकेला एअर इंडिया रीजनलच्या ताफ्यात ३ [[ए.टी.आर. ४२]] तर २ बोम्बार्डिये सीआरजे७०० विमाने आहेत व ८ [[ए.टी.आर. ७२]] विमानांची ऑर्डर दिलेली आहे.
====एअर इंडिया एक्सप्रेस====
{{मुख्य|एअर इंडिया एक्सप्रेस}}
२००४ साली स्थापन झालेली एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडियाची कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी असून ती प्रामुख्याने [[केरळ]] राज्यामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी प्रामुख्याने [[मध्य पूर्व]] व [[आग्नेय आशिया]]मधील शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे १०० सेवा पुरवते.
====एअर इंडिया कार्गो====
{{मुख्य|एअर इंडिया कार्गो}}
१९५४ साली स्थापन झालेली एअर इंडिया कार्गो ही आशियामधील सर्वात पहिली मालवाहू विमानकंपनी होती. एअर इंडिया कार्गोकडे ६ विमाने होती व भारताच्या अनेक शहरांमध्ये ती मालवाहतूक करत असे. २०१२ साली एअर इंडियाच्या पुनर्रचनेदरम्यान एअर इंडिया कार्गो बंद करण्यात आली.
 
==गंतव्यस्थाने==
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले