"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४१:
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती [[जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा|जे.आर.डी. टाटा]] ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सरकारने]] हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान [[कराची]]हून [[अहमदाबाद]]मार्गे [[मुंबई]]च्या [[जुहू विमानतळ]]ावर स्वत: चालवत आणले. टाटा एअरलाइन्सकडे सुरूवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरूवातीच्या काळात कराची ते [[मद्रास]]दरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून {{रुपया}} ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] २६ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली [[भारत सरकार]]ने एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून [[कैरो]] व [[जिनिव्हा]]मार्गे [[लंडन हीथ्रो विमानतळ|लंडन हीथ्रो]] ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली [[नैरोबी]] सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. एअर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी [[इंडियन एअरलाइन्स]]ची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एअरलाइन्सकडे वळवली गेली.
 
२१ फेब्रुवारी १९६० रोजी [[बोइंग]] कंपनीचे [[बोइंग ७०७|७०७]] विमान विकत घेऊन जेट विमान ताफ्यामध्ये आणणारी एअर इंडिया ही [[आशिया]]मधील पहिली विमानकंपनी बनली. १४ मे १९६० रोजी एअर इंडियाने [[लंडन]]मार्गे [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्कच्या]] [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ|जे.एफ.के. विमानतळापर्यंत]] प्रवासी सेवा सुरू केली. १९६२ मध्ये कंपनीचे नाव पुन्हा बदलून संक्षिप्तपणे एअर इंडिया ठेवले गेले. १९७१ मध्ये एअर इंडियाने [[बोइंग ७४७]] हे जंबो विमान आपल्या ताफ्यामध्ये सामील केले तर १९८६ मध्ये [[एरबस ए-३१०]] हे विमान घेतले. १९९३ मध्ये एअर इंडियाने [[दिल्ली]] ते न्यू यॉर्क ही विनाथांबा सेवा सुरू केली तर १९९६ मध्ये [[शिकागो]]च्या [[ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ|ओ'हेअर विमानतळापर्यंत]] सेवा चालू झाली.
==कंपनीची रचना==
 
१९९८ साली [[अटलबिहारी वाजपेयी]]ंचे मंत्रीमंडळ सत्तेवर आल्यानंतर एअर इंडियाच्या खाजगीकरणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. परंतु २००१मध्ये [[सिंगापूर एअरलाइन्स]]सोबत वाटाघाटी फिस्कटल्यानंतर खाजगीकरणाचे प्रयत्न थंडावले. ह्यादरम्यान एअर इंडियाने [[शांघाय]], [[न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ|न्यूअर्क]], [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ|लॉस एंजेल्स]], [[वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ|वॉशिंग्टन]] इत्यादी अनेक मोठ्या विमानतळांवर सेवा चालू केल्या. परंतु वक्तशीरपणा, टापटीप, व्यावसायिकता इत्यादी बाबींमध्ये सातत्याने अपयशी ठरत राहिलेल्या एअर इंडियाची पीछेहाट चालूच राहिली. २००६-०७ मध्ये एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स ह्यांचा एकत्रित तोटा तब्बल {{रुपया}}७.७ अब्ज इतका होता. ह्या दोन्ही कंपन्यांचे चुकीच्या वेळी करण्यात आलेले एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मार्च २००९मध्ये हा तोटा {{रुपया}} ७७ अब्जांवर पोचला व कंपनी बंद पडण्याचे संकट उभे राहिले. जून ते ऑगस्ट २०११ ह्या ती महिन्यांदरम्यान एअर इंडियाकडे कर्मचारी व वैमानिकांचा पगार तसेच कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी देखील निधी नव्हता. भारत सरकारने एप्रिल २००९मध्ये ३२ अब्ज तर मार्च २०१२ मध्ये ६७.५ अब्ज इतकी मदत केली. एअर इंडियाच्या आर्थिक पुनर्रचनेचे अनेक आखाडे बनवले गेले ज्यांमधील अनेक उपक्रम आजही चालू आहेत. २०१२ मधील एका सरकारी अहवालामध्ये एअर इंडियाचे अंशत: खाजगीकरण केले जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. आर्थिक तूट भरून काढण्याकरिता एअर इंडियाने आपल्या ताफ्यामधील अनेक विमाने विकली व पुन्हा भाड्याने घेतली.
 
मार्च २०१३ मध्ये ६ वर्षांच्या कालावधीनंतर एअर इंडियाने आर्थिक सुधारणा दाखवली. २०१३-१४ वित्तीय वर्षादरम्यान एअर इंडियाचा तोटा ४४ टक्क्यांनी घटला असून मिळकतीमध्ये २० टक्यांनी वाढ झाली आहे.
 
==गंतव्यस्थाने==
{{मुख्य|एअर इंडिया गंतव्यस्थाने}}
आजच्या घडीला एअर इंडिया भारतामधील ६० तर [[ऑस्ट्रेलिया]], [[आशिया]], [[युरोप]] व [[उत्तर अमेरिका]] खंडांमधील ३१ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. लहान पल्ल्याच्या देशांतर्गत सेवेसाठी [[एरबस ए-३२०]] शृंखलेमधील विमाने वापरली जातात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडिया प्रामुख्याने [[बोइंग ७७७]] विमाने वापरते.
 
==विमानांचा सद्य ताफा==
[[File:Air India.jpg|thumb|एरबस ए321-200]]
[[File:Air India A330.jpg|thumb|एरबस ए330-200]]
[[File:Air india b747-400 vt-esm lands arp.jpg|thumb|बोइंग 747-400]]
[[File:Air India Plane.jpg|thumb|बोइंग 777-200LR]]
[[File:Air India Boeing 787-8 Dreamliner (VT-ANG) departs London Heathrow Airport 2ndJuly2014 arp.jpg|thumb|बोइंग ७८७ ड्रीमलायनर]]
 
<center>
[[चित्र:Mascotte Air India.jpg|right|300 px|thumb|एअर इंडियाचा महाराजा]]
{| class="wikitable" style="text-align:center;"
|- style="background:#e32636;"
! rowspan="2" style="width:125px;" | विमान
! rowspan="2" style="width:60px;" | वापरात
! rowspan="2" style="width:35px;" | ऑर्डर
! colspan="4" class="unsortable" | प्रवासी क्षमता
!rowspan=2 | <span style="color:white;">टीपा
|-
! style="width:25px;" | <abbr title="फर्स्ट क्लास">F</abbr>
! style="width:25px;" | <abbr title="बिझनेस क्लास">C</abbr>
! style="width:25px;" | <abbr title="ईकॉनॉमी क्लास">Y</abbr>
! style="width:30px;" | एकूण
|-
|rowspan="2"|[[एरबस ए-३२०|एरबस ए319-100]]
|rowspan="2"|22
|—
|—
|8
|114
|122
|10 विमाने विकली व पुन्हा भाडेतत्वावर घेतली
|-
|—
|—
|—
|144
|144
|5 विमाने भाडेतत्वावर
|-
|rowspan="2"|[[एरबस ए-३२०|एरबस ए320-200]]
|rowspan="2"|19
|rowspan="2"|17
|—
|—
|168
|168
|rowspan="2"|6 विमाने विकली व पुन्हा भाडेतत्वावर घेतली.
|-
|—
|20
|125
|146
|-
|[[एरबस ए-३२०|एरबस ए321-200]]
|20
|—
|—
|20
|152
|172
|12 विमाने विकली व पुन्हा भाडेतत्वावर घेतली.
|-
|[[बोइंग ७४७|बोइंग 747-400]]
|5
|—
|12
|26
|385
|423
|2 विमाने विकली व पुन्हा भाडेतत्वावर घेतली.
|-
|[[बोइंग ७७७|बोइंग 777-200LR]]
|3
|—
|8
|35
|195
|238
|तिन्ही विमाने (VT-ALF, VT-ALG, VT-ALH) वापरात नाहीत
खरेदी केलेल्या ८ विमानांपैकी ५ विमाने [[एतिहाद एअरवेज]]ला विकली. उर्वरित तीन विमाने निवृत्त करून त्यांच्या जागी [[बोइंग ७८७]] विमाने आणण्यात येतील.<ref>{{cite web|दुवा=http://www.business-standard.com/article/companies/air-india-starts-sale-of-3-long-range-boeing-777s-114071601068_1.html|शीर्षक=Air India starts sale of 3 long-range Boeing 777s|date=17 July 2014|publisher=|accessdate=28 September 2014}}</ref>
|-
|[[बोइंग ७७७|बोइंग 777-300ER]]
|12
|3
|4
|35
|303
|342
|<ref>{{cite web|दुवा=http://aviation-safety.net/wikibase/wiki.php?id=166754 |शीर्षक=Aviation Safety Network: Air India incident at EWR |publisher=aviation-safety.net |date=2014-06-04 |accessdate=2014-06-04}}</ref><br/>
|-
|[[बोइंग ७८७]] ड्रीमलायनर
|17
|10
|—
|18
|238
|256
|7 विमाने विकली व पुन्हा भाडेतत्वावर घेतली.
|-
!एकूण
!100
!30
!colspan=5| &nbsp;
|}
</center>
[[चित्र:Mascotte Air India.jpg|right|200 px|thumb|एअर इंडियाचा महाराजा]]
 
==संदर्भ आणि नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले